Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिस भरतीत उच्चशिक्षित तरुणांचा वाढता ओघ! पदवी, पदव्युत्तर, अभियंतेही शिपाईपदासाठी उतरले मैदानात

सरकारी सेवेत स्थैर्य आणि प्रतिष्ठेमुळे पोलिस भरतीकडे उच्चशिक्षित तरुणांचा ओढा वाढला आहे. २०३ पदांसाठी शहर व ग्रामीण मिळून १२ हजारांहून अधिक अर्ज आल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 14, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी सेवेत स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि खासगी क्षेत्रातील अनिश्चितता या पार्श्वभूमीवर पोलिस भरतीकडे उच्चशिक्षित तरुणांचा ओढा लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहर व ग्रामीण पोलिस दलाच्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत पदवीधर, पदव्युत्तर तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची मोठी उपस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे रोजगार बाजारातील वाढती स्पर्धा आणि शासकीय नोकरीकडे वळणारा कल अधोरेखित झाला आहे.

३०४ परीक्षा निष्क्रिय! मुंबई विद्यापीठाने चक्क १२५ परीक्षा केल्या बंद; शून्य विद्यार्थ्यांची नोंदणी

शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत १५० पोलिस शिपाई पदांसाठी तब्बल ७ हजार ६९३ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर ग्रामीण पोलिस दलातील ४९ शिपाई आणि ४ बॅण्डस्मन अशा एकूण ५३ पदांसाठी ४ हजार ३४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शहर व ग्रामीण मिळून २०३ पदांसाठी १२ हजारांहून अधिक अर्ज आल्याने स्पर्धा अत्यंत तीव्र झाली आहे.

या भरती प्रक्रियेत बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., एम.ए., एम.कॉम., एमबीए तसेच अभियांत्रिकी पदवीधरांनीही शिपाई पदासाठी अर्ज केल्याने बदलता रोजगार दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे. खासगी क्षेत्रातील कंत्राटी पद्धत, मर्यादित वेतनवाढ, वाढते कामाचे तास आणि नोकरीतील अस्थिरता यामुळे तरुणांचा कल शासकीय सेवेकडे वाढल्याचे दिसून येते. नियमित वेतन, पदोन्नतीची संधी, निवृत्तीवेतन आणि इतर सुविधा हे आकर्षणाचे महत्त्वाचे घटक ठरत आहेत.

तब्बल १२२१ उच्च पदवीधर मैदानात

ग्रामीण पोलिस भरती प्रक्रियेत १२२१ उच्च पदवीधर सहभागी झाले आहेत. त्यात बी.ई. (१५), बी.टेक (१२), एमबीए (१४), बी. फार्मा (९), एम.एस्सी. (२७), एलएलबी (२), एम.कॉम (४३), बी.एस्सी. अॅग्री (२५), बीबीए/बीसीएस (२०), एम.ए. (२), बी.एस्सी. (३६३), बी.कॉम (१३५) आणि बी.ए. (५५४) यांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित उमेदवारांनी सहभाग नोंदविल्याने रोजगार बाजारातील स्पर्धेची तीव्रता अधोरेखित झाली आहे.

राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामीण पोलिस भरतीस राज्यभरातून प्रतिसाद मिळाला आहे. बुलढाणा (२४६), नाशिक (१३८), परभणी (१२३), वाशिम (४४), यवतमाळ (३४), अकोला (२९), अमरावती (२४), सोलापूर (१८), नंदुरबार (१४) यांसह विविध जिल्ह्यांतून एकूण २०६१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. महिला उमेदवारांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून येत असून ग्रामीण भरतीत १८ पदे महिलांसाठी राखीव आहेत. भरतीदरम्यान उमेदवारांसाठी निवास व भोजनाची माफक दरात व्यवस्था करण्यात आली आहे.

आत्मविश्वासाने परीक्षा द्या; गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई! जितेंद्र पापळकर यांचा इशारा

सायबर युगात तांत्रिक मनुष्यबळाची गरज

सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि डिजिटल तपास यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिस दलाला तांत्रिक ज्ञान असलेले मनुष्यबळ आवश्यक ठरत आहे. संगणक, अभियांत्रिकी व विज्ञान शाखेतील उमेदवार डेटा विश्लेषण, सायबर ट्रॅकिंग आणि डिजिटल पुरावे संकलनात प्रभावी भूमिका बजावू शकतात. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणांचा वाढता सहभाग हा पोलिस दलासाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे.

Web Title: Increasing influx of highly educated youth in police recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 04:15 AM

Topics:  

  • Police Recruitment

संबंधित बातम्या

Police Recruitment: महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती! १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज, पोलीस अधीक्षकांचे महत्त्वपूर्ण निर्देश
1

Police Recruitment: महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती! १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज, पोलीस अधीक्षकांचे महत्त्वपूर्ण निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.