Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Assembly Election : २५०० रुपये, गॅस सिलिंडर आणि रेशन…; INDIA आघाडीने झारखंडमध्ये दिल्या ७ गॅरंटी

भाजपनंतर आता इंडिया आघाडीनेही निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि JMM चे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात 7 गॅरंटी देण्यात आल्या आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 05, 2024 | 09:54 PM
INDIA आघाडीने झारखंडमध्ये दिल्या ७ गॅरंटी

INDIA आघाडीने झारखंडमध्ये दिल्या ७ गॅरंटी

Follow Us
Close
Follow Us:

झारखंड निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून जनतेला आश्वासने देण्यात येत आहेत. भाजपनंतर आता इंडिया आघाडीनेही निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि JMM चे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात 7 गॅरंटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलांना दर महिन्याला 2500 रुपये, गरीब कुटुंबांना 450 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर आणि 7 किलो रेशन देण्यात येणार आहे.

स्थानिक धोरण आणणे, सरणा धर्म संहिता लागू करणे तसेच प्रादेशिक भाषा आणि संस्कृती जपण्याचा संकल्प करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

महिला सन्मानाची हमी : महिला सन्मान योजनेअंतर्गत डिसेंबर २०२४ पासून महिलांना २५०० रुपये मानधन देण्याचे वचन दिले आहे.

हेही वाचा-“सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही तर हत्याच…” सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा

सामाजिक न्यायाची हमी : एसटी-28 टक्के, एससी-12 टक्के, ओबीसी 27 टक्के आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण आणि मागासवर्गीय कल्याण मंत्रालयाची स्थापना करण्याचे आश्वासन दिले आहे.

अन्नसुरक्षेची हमी: प्रति व्यक्ती 7 किलो रेशन देण्याचं आश्वासन. याशिवाय राज्यातील प्रत्येक गरीब कुटुंबाला 450 रुपयांना गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

रोजगार आणि आरोग्य सुरक्षेची हमी: झारखंडमधील 10 लाख तरुण पुरुष आणि महिलांना नोकऱ्या आणि रोजगार तसेच या हमी अंतर्गत 15 लाख रुपयांपर्यंतचा कौटुंबिक आरोग्य विमा देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

हेही वाचा-Assembly Election : २५०० रुपये, गॅस सिलिंडर आणि रेशन…; INDIA आघाडीने झारखंडमध्ये दिल्या ७ गॅरंटी

शिक्षणाची हमी : राज्यातील सर्व भागांमध्ये पदवी महाविद्यालये आणि जिल्हा मुख्यालयात अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठे स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रोत्साहन धोरण आणताना राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये प्रत्येकी ५०० एकर क्षेत्रफळाचे औद्योगिक उद्यान निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

शेतकरी हिताची हमी: या हमीमध्ये धान पिकाचा एमएसपी 2400 रुपयांवरून 3200 रुपयांपर्यंत वाढवण्याबरोबरच लाह, टसर, करंज, चिंच, महुआ, चिरोंजी, साल बियाणे इत्यादींच्या समर्थन मूल्यात 50 टक्के वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे.

Web Title: India alliance 7 guarantee promise to people by by hemant soren and kharge in manifesto jharkhand assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 08:07 PM

Topics:  

  • assembly election 2024
  • INDIA Alliance

संबंधित बातम्या

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज
1

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
2

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक
3

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक

Vice Presidential election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि समीकरण; काय आहे NDA आणि INDIA आघाडीचे नंबर गेम?
4

Vice Presidential election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि समीकरण; काय आहे NDA आणि INDIA आघाडीचे नंबर गेम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.