Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था; मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

  • By युवराज भगत
Updated On: Apr 29, 2024 | 06:16 PM
मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था; मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारताने दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली असून, 2027 पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

शहर भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने मेळावा

पुणे शहर भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात मोहोळ बोलत होते. शहर अध्यक्ष धीरज घाटे, उमेश शहा, प्रवीण चोरबेले, सुप्रसिद्ध व्यापारी फतेचंद रांका, महेंद्र पितलीया, रायकुमारजी नहार,  तुलसीदास पटेल, रतन किराड, राजेंद्र भाटिया, दामजीभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

विदेशी गुंतवणुकीत दुपटीहून अधिक वाढ

मोहोळ म्हणाले, मोदी सरकारच्या दशकात झालेली विदेशी गुंतवणूक दुपटीहून अधिक वाढून 640 अब्ज डॉलर्सवर गेली. 2014 पर्यंत देशात केवळ 500 स्टार्टअप्स होते, गेल्या दहा वर्षांत ती संख्या एक लाख 16 हजार इतकी झाली. स्टार्टअप्सच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 26.12 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. जीएसटी करप्रणाली लागू केल्याने एक देश, एक कर धोरणाअंतर्गत व्यापारातील असमतोल दूर होऊन निर्यातीला चालना मिळाली.

दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण

मोहोळ पुढे म्हणाले, पुणे व्यापाराचे केंद्र होण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करणे, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे, शहराच्या बाहेर मोठे व्यवसायिक केंद्र उभारणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्वेंशन सेंटर विकसित करणे आणि व्यापाऱ्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे.

Web Title: India will become third largest economy under modis leadership muralidhar mohols faith nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2024 | 06:16 PM

Topics:  

  • Prime Minister Narendra Modi
  • Pune Lok Sabha constituency

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.