Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्योग विभागाकडून विधानसभा मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर! विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना 20 नोव्हेंबरला सुट्टी

20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात निवडणूकीचे मतदान पार पडत आहे. या मतदान दिनी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे परिपत्रक जारी केले गेले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 29, 2024 | 11:17 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान केले जाणार आहे. या विधानसभा निवडणूकीत सर्व मतदारांना त्यांचा सर्वात महत्वाचा हक्क म्हणजे मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा, याकरिता उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी  मतदान करण्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जाहिर केली आहे.

हे देखील वाचा- मनसेच्या उमेदवाराचा हलगर्जीपणा नडला, वेळेत न पोहोचल्याने अर्ज दाखल करून घेण्यास नकार

मतदान करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला 

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रामधील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमामध्ये किंवा इतर कोणत्याही आस्थापनेत कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. त्यामुळे उद्योग विभागाकडून देण्यात आलेली मतदानाची सुट्टी ही या विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहणार आहे. पोटकलम (1) नुसार मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

जर अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना मतदानाच्या दिवशी पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येऊ शकतेे  मात्र याकरिता संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.  कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक असेल अथवा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

सुट्टी अथवा सवलतीबाबत तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई 

उद्योग विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची योग्य ती खबरदारी  घ्यावी. जर विभागांतर्गत असलेल्या आस्थापनातील कोणत्याही कर्मचारी  मतदाराकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य झाले नाही. अशी तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध  योग्य कारवाई करण्यात येईल, असे उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

हे देखील वाचा- शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथमध्ये कोण मारणार बाजी? ठाकरे शिंदे गटात होणार काटे की टक्कर

आज राज्यात उमेदवारांचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.  राज्यात बुधवार 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.  राज्यातील मतमोजणी ही शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. नागरिकांनी  मोठ्या संख्येंने  मतदानासाठी यावे याकरिता निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत

Web Title: Industry department announced a holiday on polling day 20th november is a holiday for all establishments under the department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 11:17 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.