Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Famous Ganpati Mandal: “ही शान कुणाची लालबागच्या राजाची”; 90 वर्षांचा इतिहास असलेल्या ‘या’ राजाची स्थापनेची रंजक गोष्ट

90 वर्षांचा इतिहास आणि परंपरा असलेल्या लालबागच्या राजाच्या स्थापनेची रंजक गोष्ट तुम्हाला माहितेय का ? असं काही कारण होतं ज्यामुळे लालबागचा राजा नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 28, 2025 | 02:06 PM
Mumbai Famous Ganpati Mandal: “ही शान कुणाची लालबागच्या राजाची”; 90 वर्षांचा इतिहास असलेल्या ‘या’ राजाची स्थापनेची रंजक गोष्ट
Follow Us
Close
Follow Us:
  • 90 वर्षांचा इतिहास
  • मुंबईतील मानाचा गणपती
  • नवसाला पावणारा गणपती म्हणून कशी झाली ओळख ?

Mumbai Famous Ganpati Mandal: गणेशोत्सव आण मुंबई यांचं समीकरणच वेगळं आहे. देशाची आर्थिक राजधानी, पर्यटन स्थळ, मायानगरी या व्यक्तिरिक्त मुंबईची आणखी एक ओळख म्हणजे गणेश मंडळ. मुंबईकरांच्या पिढ्यान पिढ्या या गणेश मंडळाच्या सेवेत खर्ची झाल्या आहे. फक्त गणपतीची मुर्तीच नाही तर सामाजिक भान जपत ही गणेश मंडळ विविध कार्यक्रम देखील राबवतात. दीड ते पाच दिवसांच्या गणपती विसर्गनानंतर मुंबईच्या या गणेश मंडळांच्या गणपतीचं दर्शन घेण्यास आणि देखावा पाहण्यास मुंबईकर मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यातील एक प्रसिद्ध मंडळ म्हणजे लालबागचा राजा.

Ganesh Chaturthi 2025 : रंगारी बदक सार्वजनिक गणपती मंडळ, लोकमान्य टिळकांच्या प्रचार-प्रसारचं प्रतिक

लालबागचा राजा

“ही शान कुणाची लालबागच्या राजाची”, नवसाला पावणारा आणि सर्वात उंच म्हणून या गणपतीची खासियत आहे. या लालबागच्या राजाला फक्त मुंबईतून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. सहसा गणपतीची मूर्ती म्हटलं की ती कारखान्यात साकारली जाते आणि नंतर तिची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते. मात्र लालबागचा गणपती हा असा आहे की, जिथे तो विराजमान होतो तिथेच त्याची मूर्ती साकारली जाते.

लालबागचं गणेश मंडळ अत्यंत जूनं आहे. मंडळाची स्थापना झाली तीच 1931 मध्ये. १९३० च्या दशकात लालबाग परिसरात मोठं मार्केट उभारण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं, पण ते पूर्ण झालं नाही. त्या भागातील कामगार आणि रहिवाशांनी एकत्र येऊन गणेशोत्सव मंडळ स्थापन केलं आणि १९३४ मध्ये पहिल्यांदा “लालबागचा राजा” बसवला.लोकांचा विश्वास होता की या राजाच्या आशीर्वादाने त्यांची मनोकामना पूर्ण होईल, म्हणून याला नवसाचा गणपती असंही म्हणतात.या मंडळाचा इतिहास जवळजवळ 90 वर्षांचा आहे.

1932 मध्ये लालबाग परिसरातील गिरणी कामगाराचं स्वत:ची बाजारपेठ होती. कालांकराने ही बाजारपेठ बंद झाली. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना याचा खूप त्रास झाला. त्या वेळी या भागातील गिरणी कामगार व कोळी समाजातील नागरिकांनी एकत्र असा पण केला की, नवी बाजारपेठ मिळाली तर गणपती बसवायचा. आणि 1934 साली कोळी बांधव आणि गरणी कामगरांना हक्काची बाजारपेठ मिळाली. त्यानंतर नवसाला पावणारा गणपती म्हणून हा या नागरिकांनी एकत्र येत गणपती बाजारपेठेत विराजमान केला. अशा रितीने 1934 साली लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन झालं.

Ganesh Chaturthi 2025: “…म्हणून म्हणतात गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला”; ‘अशी’ आहे गणपतीपुळ्याच्या मंदिराची आख्यायिका

या मंडळाची पहिली मूर्ती केशवजी गायकवाड नावाच्या मूर्तिकाराने घडवली होती. त्या वेळी मूर्ती साधारण 3 फूट उंच होती.सुरुवातीला लालबाग व परळ परिसरापुरताच असलेला हा राजा हळूहळू मुंबईबाहेर देखील नावारुपाला येऊ लागला. 1950 च्य़ा जवळपास “लालबागचा राजा” हे नाव प्रत्येकासाठी प्रचलित झालं .हळूहळू मूर्तीची उंची वाढवली गेली आणि दरवर्षी 20-25 फूट भव्य मूर्ती साकारली जाऊ लागली.1980 च्या दशकात मनोकामना पूर्ण करणारा राजा म्हणून या गणपतीची कीर्ती महाराष्ट्रभर गाजली. नवसाला पावणाऱ्या या राजाच्या ख्याती सर्वदूर पसरली. दरवर्षी चरणस्पर्श, मुखदर्शन आणि नवसाची रांग वेगवेगळ्या असतात. आजंही भाविक मोठ्या श्रद्धेने या राजाच्या पायी डोकं टेकवतात.

Web Title: Interesting story of the establishment of lalbaghcha raja with a history of 90 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 02:01 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • lalbagcha raja
  • Mumbai Ganesh Festival

संबंधित बातम्या

कार खरेदीदारांना बाप्पा पावला! यंदाच्या Ganesh Chaturthi 2025 मध्ये Tata आणि Hyundai देतेय 6 लाखांपर्यंतचे डिस्काउंट
1

कार खरेदीदारांना बाप्पा पावला! यंदाच्या Ganesh Chaturthi 2025 मध्ये Tata आणि Hyundai देतेय 6 लाखांपर्यंतचे डिस्काउंट

Latur: जिल्हाभरात गणरायाचे आगमन, पोलिसांचा कडक बंदोबस्त
2

Latur: जिल्हाभरात गणरायाचे आगमन, पोलिसांचा कडक बंदोबस्त

समस्त गावकरी मंडळाची 82 वर्षांची परंपरा; व्ही. शांताराम यांच्याकडून लाभलेली मूर्ती
3

समस्त गावकरी मंडळाची 82 वर्षांची परंपरा; व्ही. शांताराम यांच्याकडून लाभलेली मूर्ती

Mumbai Famous Ganpati Mandal:मुंबईतले प्रसिद्ध गणेश मंडळ आणि डोळे दिपवणारा देखावा; पाहायला कसं जावं? जाणून घ्या सविस्तर
4

Mumbai Famous Ganpati Mandal:मुंबईतले प्रसिद्ध गणेश मंडळ आणि डोळे दिपवणारा देखावा; पाहायला कसं जावं? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.