गणेशोत्सव आणि कोकण यांचं समीकरण खूप घट्ट आहे. रायगड ते सिंधुदुर्गपर्यंत कोकणवासी गणेशोत्सवासाठी गावी जाण्यास उत्सुक असतात. कोकण म्हणजे निसर्गाचं वरदान याच कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे गणपतीपुळे. अनेक कोकणवासियांचं हे आरोध्य दैवत. या गणपतीपुळ्याच्या मंदिराची कथा देखील तितकीच रंजक आहे. पुळ्याच्या या गणपतीची एक आख्यायिका सांगितली जाते.
रत्नागिरी ते राजापूर या सागरी महामार्गावर पावस गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशगुळे गाव आहे. या गावाला निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे. गावातील गणपतीचं टेकडीवर एक छोटसं मंदिर आहे. असं म्हणतात की, पुर्वी या ठिकाणी समुद्रमार्गे गलबतांमधून व्यापार केला जात आहे. अनेक गलबतवाले पूर्वी या ठिकाणी आपला व्यापार वाढावा आणि स्थैर्य लाभावं म्हणून असं या गणपतीकडे मागणं मागायचे. तेव्हापासून या गणपतीला गलबतवाल्यांना गणपती अशी पंचक्रोशीत ओळख मिळाली. या ठिकाणी आलेला कोणताही भाविक रिकाम्या हाती कधीच गेला नाही म्हणून ‘इच्छापूर्ती गणपती’ असं देखील या गुळ्याच्या गणपतीची ओळख आहे.
या गुळ्याच्या गणपतीचा संबंध गणपतीपुळ्याशी घट्ट आहे. गणेश गुळ्याच्या या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे 400 वर्षे जुने आहे. या मंदिराची बांधणी बांधणी जांभ्या दगडातील आहे. असं म्हणतात की गणपतीची ही मूर्ती स्वयंभू आहे. या गणपतीची आख्यायिका अशी सांगितली जाते की, याच्या नाभीतून पाण्याची संततधार वाहायची. एकेदिवशी हे पाणी वाहणं बंद झालं. त्यानंतर गणपतीला गुळ्याहून पुळ्याला स्थलांतर केलं. त्यानंतर गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला अशी म्हण प्रचलित झाली.
रामचंद्र चिपळूणकर या गृहस्थाला गणपतीने दृष्टांत देऊन मी गणेशगुळे येथे टेकडीला वास्तवाला आहे असं सांगितल. सातारच्या शाहू महाराजच्या मदत घेऊन त्यांनी हे मंदिर बांधलं सुरवातीच्या काळात गणपतीच्या पोटातून पाणी वाहायचं ते वाहायचं बंद झालं गणपतीच्या पुळ्याला स्थलातंर केलं असं सांगतात. हाच गणेशगुळ्याच्या गणपतीचं स्थलांतर केल्यावर गणपतीपुळे गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला.
गणपतीपुळेप्रमाणे मुख्य गणेशगुळे मंदिराला फारशी प्रसिद्धी प्राप्त झालेली नाही, मात्र आजही मराठवाडा, विदर्भ, गोवा, पश्चिम महाराष्ट्रातून अनेक गणेशभक्त गणेशगुळेतील श्री गणेशाच्या दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी भाद्रपद व माघी चतुर्थीला या ठिकाणी गणेशाचा मोठा उत्सव साजरा होत असतो.