Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“संधी मिळाल्यास येथील झोपडपट्टीवासीयांचे…”; महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचे जनतेला आश्वासन

२०१९ च्या अपयशाने खचून न जाता लोकसेवेचे काम सुरु केले. करोनाच्या लाटेत कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठे प्रयत्न केले. सुरेशबाबांनी लोकांची अखंड सेवा केली, असे भाजप - महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 04, 2024 | 09:43 PM
“संधी मिळाल्यास येथील झोपडपट्टीवासीयांचे…”; महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचे जनतेला आश्वासन
Follow Us
Close
Follow Us:

कराड : महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीचा जुमला असल्याचे म्हणत कराडचे लोकप्रतिनिधी या योजनेची अवहेलना करतात. तर दुसरीकडे ही आमचीच योजना असल्याचे सांगतात. मुख्यमंत्री असताना त्यांनी योजना का आणली नाही? असा टोला लगावत त्यांच्या पाटण कॉलनीतील घरालगतची झोपडपट्टी त्यांना हटवता आली नाही. मला संधी मिळाल्यास आपण येथील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करु. तसेच कराडमध्ये एम.आय.डी.सी.च्या माध्यमातून मोठे उद्योग, व्यवसाय आणून, रोजगार निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन डॉ. अतुल भोसले यांनी केले.

वडगाव हवेली (ता. कराड) येथे भाजप – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ अलोट जनसमुदायाच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आ. आनंदराव पाटील, व्हा. चेअरमन जगदीश जगताप, जयवंत पाटील, जयवंत शेलार, आप्पासाहेब गायकवाड, शेतीमित्र अशोकराव थोरात, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी नगरसेवक सुहास जगताप, हणमंतराव पवार, रणजीत पाटील, पै. धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, २०१९ च्या अपयशाने खचून न जाता लोकसेवेचे काम सुरु केले. करोनाच्या लाटेत कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठे प्रयत्न केले. सुरेशबाबांनी लोकांची अखंड सेवा केली. कराड दक्षिणच्या विकासासाठी गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून मी ७४५ कोटींचा तर, मुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून २५० कोटींचा विकासनिधी आला आहे. यातील बहुतांश कामाचे भूमीपूजन, उद्‌घाटन व लोकार्पणही आपण केले आहे. १० हजार बांधकाम कामगारांना, तसेच सर्वसामान्य माणसांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून दिला. कराडच्या स्टेडियमसाठी ९६.५० कोटींचा निधी आणला. पण माजी मुख्यमंत्री फक्त १० लाख आल्याचे धादांत खोटं बोलत असल्याचे सांगत ते माझ्यावर टीका करण्यात वेळ घालवत आहेत. यावरून आमचं कामच बोलत असल्याने त्यांना या स्तराला यावे लागले आहे. तुमच्या काळात तुम्हाला मतदारसंघात मोठे उद्योग आणता आले नाहीत आणि आता आय.टी. हब करण्याची खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल कशासाठी देताय? असा सवाल डॉ. भोसले यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: सोलापूरच्या ‘या’ मतदारसंघात बंडखोरी रोखण्यात महायुती, ‘मविआ’ला यश; कोण लढणार अन् कोणाची माघार? जाणून घ्या

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, निवडणुकीचे मुद्दे बाजूला ठेऊन प्रचार दुसऱ्याच दिशेला नेण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होत आहेत. त्यांच्या हातून आत्तापर्यंत काहीही विकास झाला नसल्यानेच त्यांच्यावर तसे करायची वेळ आली आहे. येत्या काळात रोजगार निर्मितीसाठी मोठमोठे प्रकल्प येथे आणण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहनराव जाधव, आनंदराव पाटील, जगदीश जगताप यांचीही भाषणे झाली.

वय झाल्यावर निवृत्त झालेलं चांगलं!

वय झालं की निवृत्त झालेलं चांगलं असतं. वय झाल्यावर व्यक्तीने पदावरुन स्वत: बाजूला व्हावं असं म्हणतात. पण तो जर बाजूला जाणार नसेल, तर मतदारांनी त्याला 20 तारखेला बाजूला सारायला हवे, असे आवाहन शेतीमित्र अशोकराव थोरात केले. तसेच मलकापूरमधून अतुलबाबांना भरघोस मताधिक्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कराडची ओळख लोक ठरवतील

यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) आणि पी. डी. पाटीलसाहेब ही खरी कराडची ओळख आहे. त्यामुळे कराड ही कोणाची वैयक्तिक मुक्तेदारी नाही. या निवडणुकीत कराड शहर आणि ग्रामीण असा संगम झाला असून कराडची ओळख कोण आहे, हे आता लोक ठरवतील. डॉ. अतुलबाबांना कराड शहरातून किमान ८ ते १० हजारांचे मताधिक्य लीड देणार असल्याचा विश्वास राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त केला.

Web Title: Karad mahayuti candidate dr atul bhosale said karad will develop if i win the election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 09:43 PM

Topics:  

  • Dr Atul Bhosale
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

भाजप आमदाराच्या पीएचीच दोन मतदारसंघात नोंदणी; काँग्रेसने केली पोलखोल
1

भाजप आमदाराच्या पीएचीच दोन मतदारसंघात नोंदणी; काँग्रेसने केली पोलखोल

‘सातारा जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला करणार’; नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा विश्वास
2

‘सातारा जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला करणार’; नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा विश्वास

कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्ष संघटना मजबूत करणार…; भाजपचे नवीन जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांची ग्वाही
3

कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्ष संघटना मजबूत करणार…; भाजपचे नवीन जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.