सोलापूरमध्ये बंडखोरी रोखण्यात सत्ताधारी, विरोधकांना यश (फोटो- टीम नवराष्ट्र)
सोलापूर/शेखर गोत सुर्वे: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. सर्व पक्षांना अनेक ठिकाणी बंडखोरी रोखण्यात यश आले आहे. तसेच राज्यभरात आता प्रचारसभा देखील सुरू झाल्या आहेत. उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदार संघातून बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीला अल्पशा यश प्राप्त झाले आहे . सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीला मोठी कसरत करावी लागली .काँग्रेसचे बंडखोर उमेदवार माजी आमदार दिलीप माने यांनी उमेदवारी माघार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिध्देश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांच्या गंगा निवासस्थानी बैठक घेण्यात आली. बैठकी दरम्यान धर्मराज काडादी हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहेत. खा. प्रणिती शिंदे यांच्या समवेत माजी आमदार दिलीप माने आणि धर्मराज काडादी यांनी उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात दाखल झाले .प्रसार माध्यमांशी न बोलता प्रणिती शिंदे आणि दिलीप माने निघून गेले.
तर इकडे शहर उत्तर मधून भाजपाच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे . विजयकुमार देशमूख यांच्या विरोधात लढत होणार आहे .नुकतेच पक्षांतर केलेले शिवसेना शिंदे गटातील बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांनी पुन्हा घर वापसी करत उमेदवारी माघार घेतले आहे . दक्षिण मधील भाजपाचे बंडखोर उमेदवार श्रीशैल हत्तुरे यांचे बंड शमविण्यात विजयकुमार देशमूख यांना यशप्राप्त झाले आहे. शहर उत्तर मध्ये भाजपाच्या विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात अपक्ष शोभा बनशेट्टी, शरद पवार गटातून महेश कोठे आशी तिरंगी लढत होणार आहे.
सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघातून ३९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते.या पैकी १९ जणांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. काँग्रेसचे चेतन नरोटे, भाजपा देवेंद्र कोठे, माकप आडम मास्तर, एमआयएम फारुख शाब्दी आशी चौरंगी लढत होणार आहे . दक्षिण मध्ये भाजपाच्या सुभाष देशमूख विरुद्धात उबाठा गटाचे अमर पाटील,मनसेचे महादेव कोगनुरे,अपक्ष धर्मराज काडादी आशी चौरंगी लढत होणार आहे . ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते या पैकी १५ जणांनी माघार घेतली आहे. २५ उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत .
मनसेची शहर मध्य मधून माघार
अटीतटीच्या निवडणूकीच्या रणभूमीतून मनसेनी शहरमध्य मतदारसंघातून उमेदवारी माघार घेतली आहे .नागेश पासकंटी यांना मनसे नी उमेदवारी घोषीत करून एबी फॉर्म दिला होता. मनसे नी उमेदवारी माघार घेतल्याने विविधरंगी चर्चा होत आहे.
शिवसेना शिंदे गटानी मागणी केलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या २५ नगरसेवक उमेदवार जागेचा प्रस्ताव भाजपने मान्य केला असल्याची अमोल ब शिंदे व भाजपा शहरध्यक्ष नरेंद्र काळे यांनी माहिती दिली .