Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड अर्बन बँकेला राज्यभर विस्ताराचा हिरवा कंदील; रिझर्व्ह बँक व सहकार विभागाची मान्यता

सध्या बँकेच्या आठ जिल्ह्यांत ७२ शाखा कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांत सुरू करण्यात आलेल्या नव्या शाखांमधूनच तब्बल ४५० कोटी रुपयांचा अतिरिक्त व्यवसाय मिळाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2026 | 11:18 AM
कराड अर्बन बँकेला राज्यभर विस्ताराचा हिरवा कंदील

कराड अर्बन बँकेला राज्यभर विस्ताराचा हिरवा कंदील

Follow Us
Close
Follow Us:

कराड : शतकोत्तर परंपरा लाभलेल्या कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या शेड्यूल्ड बँकेच्या विस्ताराला मोठी गती मिळाली असून, बँकेचे कार्यक्षेत्र आता संपूर्ण महाराष्ट्रभर वाढवण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सहकार विभागाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील विविध शहरांमध्ये नवीन शाखा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, बँकेच्या व्यवसायवाढीला मोठी चालना मिळणार आहे.

याबाबत बँकेचे अध्यक्ष समीर जोशी यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या बँकेच्या आठ जिल्ह्यांत ७२ शाखा कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांत सुरू करण्यात आलेल्या नव्या शाखांमधूनच तब्बल ४५० कोटी रुपयांचा अतिरिक्त व्यवसाय मिळाला आहे. राज्यभर विस्तार झाल्यानंतर ग्राहकसेवेच्या नव्या संधी निर्माण होणार असून, ग्रामीण व शहरी भागात बँकेची उपस्थिती अधिक मजबूत होईल.

Mumbai News : नायरमध्ये बायोकेमिस्ट्री ब्लड ॲनालायझर! सीएसआर निधीतून सहाय्य; अत्याधुनिक व दर्जेदार सेवा मिळणार

बँकेचे उपाध्यक्ष शशांक पालकर म्हणाले, बदलत्या बँकिंग व्यवस्थेनुसार डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यात येत आहे. ग्राहकांना यूपीआय आणि अन्य अत्यावश्यक डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आगामी काळात सर्व डिजिटल सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू असून, त्यासाठी आवश्यक तांत्रिक अंमलबजावणीही वेगाने सुरू आहे.

बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम म्हणाले, शंभर वर्षांहून अधिक काळाच्या प्रवासात बँकेने सातत्याने प्रगतीची परंपरा जपली आहे. आर्थिक वर्षात तब्बल ७५० कोटी रुपयांची व्यवसायवाढ नोंदविण्यात आली असून, सलग तीन वर्षे नक्त एनपीए शून्य टक्के राखण्यात बँकेला यश आले आहे. मार्च २०२६ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ६५०० कोटी रुपयांच्या पुढे गेला असल्याचे सांगताना ते म्हणाले, व्यवसायवाढीत सातत्य राखणे, शून्य एनपीए कायम ठेवणे आणि महाराष्ट्रभर बँकेचा विस्तार घडवून आणणे, हेच चालू आर्थिक वर्षातील प्रमुख उद्दिष्ट असेल.

दरम्यान, इंधनदरवाढ आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन बँकेने इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विशेष कर्ज योजना जाहीर केली आहे. याबाबत बोलताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी, बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकींसाठी ७.७५ टक्के आणि चारचाकींसाठी ८.२५ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांच्या विश्वासामुळेच बँकेला राज्यभर विस्ताराची संधी मिळाली आहे. पारदर्शक सेवा, अचूक व्यवहार आणि ग्राहककेंद्रित धोरणामुळे बँकेने सातत्याने प्रगती साधली आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखून आधुनिक सेवांवर भर दिल्यामुळेच बँक आजही विश्वासार्हतेचे प्रतीक बनली आहे.

– सुभाषराव जोशी, अर्बन कुटुंबप्रमुख व ज्येष्ठ संचालक

Web Title: Karad urban bank gets green signal for statewide expansion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Karad news
  • Karad Urban Bank

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.