Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra-Karnatak Seema Vaad: महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वाद पेटणार; एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारली

डेपो परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची ही गळचेपी असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आला आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 09, 2024 | 12:24 PM
Maharashtra-Karnatak Seema Vaad: महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वाद पेटणार; एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारली
Follow Us
Close
Follow Us:

बेळगाव:   महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद  पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेळगावातील वॅक्सिन डेपो मैदानात उद्या (10 डिसेंबर)   महाराष्ट्र एकीकरण समितीचं महाअधिवेशन होणार आहे.  कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली आहे.  या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारकडून  वॅक्सिन डेपो मैदानातसह आजुबाजूच्या परिसरात सकाळी सात वाजल्यापासून सांयकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय डेपो परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची ही गळचेपी असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आला आहे.

कर्नाटक सरकारने महामेळाव्याला परवानगी नाकारत मेळाव्याच्या ठिकाणी  पोलिसांचा मोठा बंदोबस्त वॅक्सिन डेपो मैदानात तैनात करण्यात आला आहे. मराठी भाषिकांनी जमू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात असताना दुसरीकडे मात्र  मराठी भाषिकांनीदेखील मेळाव्याला जाणाऱ असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मेळावा घेण्याची भूमिका घेतल्याने परिसरात तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

World’s Best Cities 2025: लंडन पुन्हा एकदा जगातील सर्वाेत्तम शहरांच्या यादीत पहिल्या

कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होतो. पण यावर्षी कर्नाटक सरकारने मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारची दडपशाही सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात येत आहे.  कितीही संचारबंदी आणि पोलीस बंदोबस्त तैनात केला तरी, वॅक्सिन डेपो मैदानात एकत्र जमणार असल्याचा इशारा मराठी भाषिकांनी दिला आहे.   त्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मैदानात येऊन पाहणीदेखील केल्याची माहिती आहे. पण उद्या होणाऱ्या या महामेळाव्याला परवानगी मिळणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव सीमेवरच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना अडवण्यात आले असून अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनेकांना ताब्यात घेण्यात आले. बेळगावच्या सीमेवर मराठी माणसांना अडवण्यात आल्याची माहिती आहे. बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या  मेळाव्याला मराठी भाषिकांनी जाऊ नये म्हणून  कर्नाटक सीमेवर  कोनगोळी टोलनाक्यावर  मोठा पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला आहे.  शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनाही रोखण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, बेळगाव हद्दीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाचीही कसून तपासणी केली जात आहे.

Katrina-Vicky Anniversary: नशिबाने जुळवली रेशीमगाठ; विकी – कतरिनाची हटके

Web Title: Karnataka government denies permission for maharashtra unification committee gathering nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 11:37 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.