जगभरातील शहरे त्यांच्या आकर्षणशक्ती, पर्यटकांचे स्वागत, आणि व्यवसायाच्या संधींवर आधारित रेटिंग मिळवत असताना, लंडनने सलग दहाव्या वर्षी ‘वर्ल्ड्स बेस्ट सिटीज 2025’च्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही रँकिंग रेसोनन्स कन्सल्टन्सी आणि इप्सॉस यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केली गेली आहे, ज्यामध्ये ‘लव्हेबिलिटी’ म्हणजे प्रेमसुलभता, ‘प्रॉस्पेरिटी’-म्हणजे समृद्धी आणि ‘लिव्हेबिलिटी’ म्हणजे जगण्यासाठी योग्य वातावरण या तीन मुख्य घटकांचा विचार करण्यात आला आहे. ( फोटो सौजन्य: iStock)
World's Best Cities 2025: लंडन पुन्हा एकदा जगातील सर्वाेत्तम शहरांच्या यादीत पहिल्या स्थानावर; भारताला निराशा
लंडनने आपले जागतिक महत्त्व आणि सांस्कृतिक वारसा सिद्ध करत या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या शहराची उत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, शिक्षणक्षेत्रातील जागतिक नेतृत्व, आणि पर्यटनस्थळांचे वैविध्य लंडनला इतर शहरांपेक्षा वेगळे बनवते
फ्रान्सची राजधानी पॅरिस जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख ठिकाण आहे. जगप्रसिद्ध आयफेल टॉवर, कला, फॅशन, आणि गॅस्ट्रोनॉमीमुळे पॅरिस दुसऱ्या स्थानावर आहे
जपानची राजधानी टोकियो तंत्रज्ञान, स्वच्छता आणि उत्कृष्ट नागरी सुविधांमुळे यादीत तिसऱ्या स्थानी आहे. हे शहर आधुनिकतेसह पारंपरिक संस्कृतीचे सुंदर मिश्रण सादर करते
सिंगापूरने शिस्तबद्धता, स्वच्छता आणि जागतिक दर्जाची नागरी सोयीसुविधा यामुळे चौथे स्थान पटकावले आहे. हे शहर आर्थिक केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे
इटलीचे रोम पाचव्या स्थानावर आहे. प्राचीन इतिहास, वास्तुकला, आणि जगप्रसिद्ध ठिकाणे जसे की कोलोसियम यामुळे हे शहर यादीत उच्च स्थानावर आहे
या यादीत भारताला स्थान मिळालेले नाही.प्रदूषण, वाहतूक कोंडी, आणि नागरी सेवांची कमतरता ही प्रमुख आव्हाने आहेत. सध्या भारताचा संघर्ष अजूनही सुरू आहे