Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील खडकवासला धरण ‘फुल्ल’; भिडे पूल गेला पाण्याखाली, जाणून घ्या इतर धरणांची स्थिती…

पुण्यात होणाऱ्या या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत अक्षरश: गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी आले आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील 5 सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 25, 2024 | 01:32 PM
पुण्यातील खडकवासला धरण 'फुल्ल'

पुण्यातील खडकवासला धरण 'फुल्ल'

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या मुसळधार पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरिपीट उडाली. काल रात्रीपासून होत असलेल्या तूफान पावसाने पुण्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे पुण्यातील धरणांची स्थिती सुधारत आहे. खडकवासला धरण पूर्णत: भरले असून, धरणातून विसर्ग सुरु आहे.

पुण्यात होणाऱ्या या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत अक्षरश: गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी आले आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील 5 सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.

मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलेले आहे. तर रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याने, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली. शर्थीचे प्रयत्न करत चाकरमानी आपल्या कामाच्या ठिकाणी आणि कार्यालयात पोहचत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये पावसाने तूफान बॅटिंग केली आहे.

पुण्यातील भिडे पूल गेला पाण्याखाली

पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील विसर्ग सुरू केला आहे. काल रात्री भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्तीत पाणी शिरले आहे. संगम पूल पुलासमोरील वस्तीत पाणी गेले आहे. पुणे महापालिकेसमोर असलेला पूल बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खडकवासला धरण फुल्ल तर टेमघर 57 टक्क्यांवर

या मुसळधार पावसामुळे पुण्यातील धरणसाठा भरत आहे. त्यात खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. तर टेमघर 57 टक्के, वरसगाव 63 टक्के तर पानशेत 76 टक्क्यापर्यंत भरले आहे. त्यामुळे आता पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटेल असे सांगितले जात आहे.

Web Title: Khadakwasla dam overflow bhide bridge went under water know other bridge condition nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 01:04 PM

Topics:  

  • Khadakwasla Dam
  • Maharashtra Rain Update
  • Pune Rain
  • Pune Rain News

संबंधित बातम्या

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज
1

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान
2

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान
3

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Rainfall News: अतिवृष्टीने नाशिकमध्ये हाहा:कार; भुजबळ दौरा सोडून नाशिककडे रवाना
4

Nashik Rainfall News: अतिवृष्टीने नाशिकमध्ये हाहा:कार; भुजबळ दौरा सोडून नाशिककडे रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.