शुक्रवारी पुणे शहर आणि लगतच्या परिसरात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर सूर्यदर्शनाची शक्यता कमीच होती.
पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने राज्यातील पावसाची तीव्रता घटत आहे. त्यामुळे पुणे शहरात पुढील काही दिवस अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यानंतर मुठा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. परिणामी शुक्रवारी शहरातील ऐतिहासिक भिडे पूल पाण्याखाली गेला.
सोमवारी पहाटे हलक्या सरींनी सुरुवात झाल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर अचानक वाढला. त्यानंतर सलग दोन ते तीन तास शहरातील विविध भागांत जोरदार पाऊस झाला.
गेल्या चोवीस तासांत कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील घाट भागात पावसाचा जोर अधिक राहिला.
अयोग्य छाटणी हेही झाडे पडण्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे. अनेकदा एका बाजूच्या फांद्या अधिक छाटल्या जातात. त्यामुळे झाडाचा भार असंतुलित होतो आणि जोरदार वाऱ्याच्या वेळी झाड कोसळण्याचा धोका वाढतो.
Pune Flight Delays: मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे सोमवारी पुणे विमानतळावरील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही उड्डाणे इतर विमानतळांकडे वळवावी लागली, तर काही विमानांना विलंब झाला आणि एक उड्डाण…
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी (ता. ७) रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर सिंहगड घाट परिसर पर्यटकांसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय पुणे वनविभागाने घेतला आहे.
पावसाचा जोर अशाच पद्धतीने राहिल्यास धरण 80 टक्के भरले जाऊ शकते. त्यामुळे तसे झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जून महिन्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामाबाबत चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गाला या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शेतमशागत आणि खरीप पेरणीच्या कामांना वेग आला असून शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण…
सध्या पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केली जात आहे. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणसाखळी क्षेत्रात पाव ते अर्ध्या टीएमसी पाण्याची आवक झाल्याचे समजते आहे.
सततच्या पावसाने सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच घाट परिसरात प्रवास करणाऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुणे शहरात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. गेले अनेक दिवस पुणे शहरात ढगाळ वातावरण दिसून येत होते.
गेल्या २४ तासांतील पावसाच्या नोंदीनुसार, लोणावळा येथे १६० मिमी, डोंगरवाडी येथे १५८ मिमी, तर ताम्हिणी, पोफळी आणि वळवण येथे प्रत्येकी १२५ मिमी पाऊस झाला. खोपोली येथे ७५ मिमी, धारावी येथे…
पावसाळी सुरुवातीनंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात वाढ होत गेली. १२ एप्रिलपर्यंत कमाल तापमान ३७ अंश सेल्सियस होते, त्यानंतर ते ३९ ते ४० अंशांदरम्यान स्थिरावले.