Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…हा तर छत्रपती घराण्याचा अवमान’; खासदार धनंजय महाडीकांची सतेज पाटलांवर सडकून टीका

उमेदवारी माघार घेण्याच्या अखेरच्या क्षणी घडलेल्या या घटनेनं व्यतीत झालेले काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती आपल्या खासदार पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2024 | 07:16 PM
"...हा तर छत्रपती घराण्याचा अवमान'; खासदार धनंजय महाडीकांची सतेज पाटलांवर सडकून टीका

"...हा तर छत्रपती घराण्याचा अवमान'; खासदार धनंजय महाडीकांची सतेज पाटलांवर सडकून टीका

Follow Us
Close
Follow Us:
कोल्हापूर : काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्या घमेंडी स्वभावामुळं काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. स्वतःच्या सत्तेसाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा वापर करायचा आणि त्यांना असं अर्वाच्य भाषेमध्ये बोलायचं, हे कोल्हापूरकर सहन करणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ होईल, असा घणाघात राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. कोल्हापुरात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

“कोल्हापूरच्या राजघराण्यातील सदस्य मधुरिमाराजे छत्रपती यांचं उमेदवारी जाहीर झालेलं पत्र आले. वाजत गाजत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीची पहिली पसंती राजू लाटकर ना होती आणि दुसरी पसंती मधुरिमाराजे छत्रपतींना होती.  हा तर छत्रपती घराण्याचा अवमान आहे. लाटकर यांची उमेदवारी मागे घेण्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. खासदार शाहू महाराज, मधुरिमाराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांनी जाऊन उमेदवारी मागे घेतली. हे काँग्रेसच्या संपूर्ण इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल.   उमेदवारी मागं घेऊन कार्यालयातून बाहेर येत असतानाचे व्हिडिओ हे मन हेलावून टाकणारे होते. सतेज पाटील यांच्या स्वभावामुळं ही परिस्थिती आली. मी म्हणेण तोच कायदा, मी या कोल्हापूरचा मालक, काँग्रेसचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते माझे नोकर आहेत. हा त्यांचा अविर्भाव होता.

सामान्य कार्यकर्त्याला मिळालेली उमेदवारी बदलली त्यादिवशी त्यांचं नाक कापलं गेलं. आज सुद्धा माघार घेतल्यानं काँग्रेस पक्षाची मोठी नाचक्की झाली आहे. कोल्हापूर उत्तर हा आमचा बालेकिल्ला आहे. मात्र, यावेळी त्यांच्या पक्षाचं हात चिन्हच त्यांच्याकडे नाहीये मग प्रेशर कुकरवर मतदान करायच का?”, असा सवाल महाडिक यांनी उपस्थित केला. “काँग्रेसनं पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल आणि राजेश क्षिरसागर आजपर्यंतच्या इतिहासाच्या विक्रमी मतांनी निवडून येतील,” असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला. त्यांच्या आघाडीमध्ये मशाल, तुतारी आणि हात हे चिन्ह आहे. मात्र याशिवाय आता प्रेशर कुकर देखील महाविकास आघाडीचं नवीन चिन्ह झालेलं आहे.
 उमेदवारी माघार घेण्याच्या अखेरच्या क्षणी घडलेल्या या घटनेनं व्यतीत झालेले काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती आपल्या खासदार पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. “ज्या पद्धतीनं शाहू महाराजांचा अवमान झाला आहे तो कोणीही सहन करणार नाही. आजपर्यंत राजघराण्यावर अशा पद्धतीची भाषा आणि वक्तव्य करण्याचं धाडस कोणीही केलं नाही. सतेज पाटील स्वतःला सर्वोच्च समजत आहेत,” असा घणाघात महाडिक यांनी केला.

हेही वाचा: “दम नव्हता तर उभं रहायचं कशाला, मी पण दाखवली असती…, मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर सतेज पाटील चांगलेच भडकले

मधुरिमारजे या महाविकास आघाडीच्या उत्तर कोल्हापूरच्या अधिकृत उमेदवार होत्या. राजेश लाटकर यांना विरोध झाल्याने कॉँग्रेसने मधुरिमारजे यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता त्यानीच अचानक अर्ज मागे घेतल्याने आमदार सतेज पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

Web Title: Bjp rajyasabha mp dhananjay mahadik criticizes satej patil about madhurimaraje withdraw candidancy form kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 07:16 PM

Topics:  

  • Dhananjay Mahadik
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Mahadevi Elephant: ‘माधुरी’ला परत आणण्यासाठी कोल्हापूरकर सरसावले; ‘ही’ मोहीम राबवत थेट….
1

Mahadevi Elephant: ‘माधुरी’ला परत आणण्यासाठी कोल्हापूरकर सरसावले; ‘ही’ मोहीम राबवत थेट….

Mahadevi Elephant: नाद करा पण आमचा कुठं! कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश? वनमंत्र्यांनी दिली तोडगा काढण्याची ग्वाही
2

Mahadevi Elephant: नाद करा पण आमचा कुठं! कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश? वनमंत्र्यांनी दिली तोडगा काढण्याची ग्वाही

‘…तर ते माझ्या टार्गेटवर असतील, त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होईल’; सतेज पाटील यांनी दिला इशारा
3

‘…तर ते माझ्या टार्गेटवर असतील, त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होईल’; सतेज पाटील यांनी दिला इशारा

Kolhapur : रॉयल्टी बुडवून नाही तर कष्टाने हेलिकॉप्टर घेतलयं; शिवाजी पोवारांचा सतेज पाटलांना टोला
4

Kolhapur : रॉयल्टी बुडवून नाही तर कष्टाने हेलिकॉप्टर घेतलयं; शिवाजी पोवारांचा सतेज पाटलांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.