Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

मे महिन्यात ९ विधान परिषदेच्या जागा रिक्त होणार आहेत. भाजपच्या ४, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाची प्रत्येकी १ जागा रिक्त होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 26, 2026 | 08:28 AM
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांची निवड होणार?

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांची निवड होणार?

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच, राज्यसभा निवडणूक बिनविरोध होताच विधान परिषदेला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंची जागा रिक्त झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद खाली होणार आहे. या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपची विरोधी पक्षनेते पदासंदर्भात नवीन खेळी समोर आली आहे. मे महिन्यात ९ विधान परिषदेच्या जागा रिक्त होणार आहेत. भाजपच्या ४, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाची प्रत्येकी १ जागा रिक्त होणार आहे. विधान परिषदेसाठी २९ मतांचा कोटा असणार आहे. अशात, महायुतीच्या वाट्याला ८ जागा येणार, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला १ जागा येणार आहे. अशात, राज्यसभेच्या जागेवरुन विरोधी पक्षनेतेपदाचे भवितव्य ठरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या प्रत्येकी एक जागा आहेत. एकूण २९ मतांचा हा कोटा आपल्याला पाहायला मिळतो. महायुतीच्या वाट्याला एकूण आठ जागा मिळताना दिसतात आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा जाताना दिसत आहे. या परिस्थितीमध्ये भाजपाकडून एक खेळी खेळली जात आहे.

राज्यसभेनुसार गणित ठरण्याची शक्यता

राज्यसभेची जागा आणि राज्यसभेची एकूणच निवडणूक बिनविरोध झाली तर भाजपकडून किंवा महायुतीकडून या जागा संदर्भात विचार होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने राज्यात राज्यसभेवरून विरोधी पक्ष नेते पदाचा पद ठरताना दिसणार आहे. विधान परिषदेत काँग्रेसकडे ६, शिवसेनेकडे ६ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाकडे ३ जागा आहेत.

मे महिन्यात परिषदेच्या नऊ जागा रिक्त

राज्यसभा निवडणुकीवर विरोधी पक्ष नेत्याची वाटचाल किंवा भवितव्य असल्याचे दिसून येत आहे. राज्यसभा निवडणुकीबद्दल पाहायचे झाले तर सहा जागा या महायुती आणि एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे, एकूणच ही भाजपची खेळी म्हणावे लागणार आहे. अंबादास दानवे यांची जागा रिक्त झाल्यानंतर विरोधी पक्षनेते पद खाली झाल्यानंतर त्या जागी काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा : धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

Web Title: Satej patil name likely to be confirmed for the post of leader of opposition in the legislative council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • political news
  • Satej Patil
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
1

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
2

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
3

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
4

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.