सतेज पाटील (फोटो- ट्विटर)
कोल्हापूर: ऐन विधानसभा निवडणुकीत राज्यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी माघार न घेतल्याने मधुरिमाराजे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयाने चर्चांना उधाण आलं आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरी रोखण्यात थोडेफार यश मिळाले आहे. मात्र उत्तर कोल्हापूरमध्ये वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. मधुरिमाराजे यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
मधुरिमारजे या महाविकास आघाडीच्या उत्तर कोल्हापूरच्या अधिकृत उमेदवार होत्या. राजेश लाटकर यांना विरोध झाल्याने कॉँग्रेसने मधुरिमारजे यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता त्यानीच अचानक अर्ज मागे घेतल्याने आमदार सतेज पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. ‘दम नव्हता तर उभ राहायच नव्हतं ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद’ असे विधान करत सतेज पाटील यांनी आपला राग व्यक्त केला आहे. सुरुवातीला कॉँग्रेसने राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र त्यान अंतर्गत विरोध झाल्याने कॉँग्रेसने मधुरिमाराजे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र आता त्यांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कोल्हापूरमध्ये नव्या ट्विस्ट निर्माण झाला आहे.
दरम्यान, राजेश लाटकर अजूनही कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे लाटकर अज्ञातस्थळी पोहोचल्याने भूया उंचावल्या गेल्या. रविवारी छत्रपती कुटुंबियांकडून राजेश लाटकर यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, यावेळी बोलताना राजेश लाटकर यांनी षड्यंत्र रचून आपली उमेदवारी रद्द करण्यात आली, असा थेट आरोप कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासमोर केला होता. लाटकर यांची समजूत काढण्यासाठी छत्रपती कुटुंबीयांकडून मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे, खासदार शाहू महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आदी नेते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांची उमेदवारी मागे घेतली जाईल, अशी चर्चा त्यानंतर रंगली होती. मात्र नाॅटरीचेबल झाल्याने एक प्रकारे काँग्रेसचं टेन्शन वाढलं होते. राजेश लाटकर हेच वेळ संपेपर्यंत अर्ज माघारी घेण्यास न आल्याने अखेर मधुरिमा राजे यांनी आपला अर्ज मागे घेतला.