कुरुंदवाड येथील हजरत दौलतशहा वली मार्केटमध्ये फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला देवगड हापूस आंबा आजच दाखल झाला. देवगड हापूस, पायरी या आंब्याचा लिलावाद्वारे देवगड हापूस एक डझनला १७०० रुपये तर पायरी एक डझन ७०० रुपये इतका दर निघाला.
कुरुंदवाड : कुरुंदवाड येथील हजरत दौलतशहा वली मार्केटमध्ये फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला देवगड हापूस आंबा (Devgad) आजच दाखल झाला. देवगड हापूस, पायरी या आंब्याचा लिलावाद्वारे देवगड हापूस एक डझनला १७०० रुपये तर पायरी एक डझन ७०० रुपये इतका दर निघाला.
कुरुंदवाड मार्केटमध्ये लवकर देवगड हापूस बाजारात आल्याने दर तेजीत आहे. देवगड हापूस आंबा खरेदीसाठी निपाणी, इचलकरंजी, सांगली, चिकोडीहून व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती.
देवगड हापूस आंब्याचा दर तेजीत येऊन सामान्यांना आंबा घेणे परवडत नसल्याने आंब्याची चव घेण्यासाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी परिस्थिती सध्या कुरूंदवाड परिसरात पाहावयास मिळत आहे.
गौस दलाल यांच्या दुकानात (पेढीवर) प्रसिध्द बाळू दलाल यांनी लिलावाची बोली केली. चालू हंगामातील पहिल्या हापूस पायरी आंब्याचा लिलाव करण्यात आल्याने हापूस डझन १७०० रुपये तर पायरी डझन ७०० रुपये इतका दर निघाला. व्यापाऱ्यांनी लिलाव बोलून देवगड हापूस पायरी आंब्याची खरेदी केली. निपाणी, सांगली, मिरज, इचलकरंजी या शहरातील मार्केटच्या अगोदर आंबे कुरुंदवाड मार्केटमध्ये दाखल झाले आहेत.
Web Title: Devgad hapus mango enters in kurundwad market kolhapur nrka