
कोल्हापूर : पुरोगामी विचारांची आणि सामाजिक जागृतीची परंपरा जपणान्या छत्रपती शाहू जिल्ह्यात महाराजांच्या कोल्हापूर अंधश्रद्धेचा काळा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘चुटकीवाला बाबा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका भोंदू बाचाचा भूतबाधा आणि करणी करणारा उद्योग उघडकीस आला आहे. शहरातील टिंबर मार्केट आणि गंजी माळ परिसरात चास्तव्यास असलेला हा बाचा नागरिकांना भूतबाधा उतरविण्याचे, करणी तोडण्याचे आश्वासन देत गंडा घालत असल्याचे समजते. विशेष म्हणजे, या बाबाच्या हालचालीविषयी पोलिसांना कोणतीच माहिती नसल्याने तो बराच काळ लोकांची फसवणूक करत फिरत होता.
हा भोंदू बाबा स्वतःत्ला ‘चुटकीवाला बाबा’ म्हणवून घेतो. त्याच नावाने त्याला ओळखले जाते. लोकांच्या समस्यांवर तो चुटकी वाजवत उपाय सांगतो, असा त्याचा दावा होता. उतरविण्यासाठी भूतवाधा तो स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी विधी करत असल्याची माहिती पुढे आली आहे. इतकेच नव्हे तर लोकांच्या छायाचित्रांवर नारळ फोडून ‘करणी तोडतो’ असा चमत्कारी दावा तो करत होता. काही अंधश्रद्धाळू लोक त्याच्या जाळ्यात अडकून त्याला पैसे देत होते, असा संशय व्यक्त केला जात आहे.दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अशा भोंदू बाबांचे प्रमाण अचानक वाढल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे.
निवडणुकीच्या काळात काही लोक आपला प्रभाव वाढविण्यासाठी किंवा प्रतिस्पध्यांवर करणी करण्याच्या अफवा पसरवून जनतेला गंडा घालतात, असेही प्रकार पूर्वी घडले आहेत. त्यामुळे या काळात जादूटोणा, करणी आणि अंधश्रद्धेचा बाजार चांगलाच तेजीत येती. पोलिस प्रशासनाकडून मात्र या बाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तथापि, अशा प्रकारांवर लक्ष ठेवून कारवाई सुरू करण्याचे संकेत पोलिस सूत्रांकडून देण्यात आले आहेत. नागरिकांनी अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे, आणि अशा घटनांची पुरोगामी कोल्हापूर अंधश्रध्देच्या विळख्यात पुरोगामी वियारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये अशा भोंदू बाचांचा प्रभाव बाढणे ही समाजाच्या वैचारिक पातळीवरची धोक्याची घंटा मानली जात आहे. सामाजिक जागृती आणि कायदेशीर कारवाई या दोन्हींच्या माध्यमातूनच अशा अंधश्रद्धाळू प्रवृत्तीला आळा बसू शकतो, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर हा शाहू महाराजांनी दिलेल्या सामाजिक समानता आणि शिक्षणाच्या विचारांचा केंद्रबिंदू असलेला जिल्हा आहे, अशा ठिकाणी अजूनही काही लोक अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकत आहेत, ही खेदजनक बाब असल्याचे एका सामाजिक कार्यकत्यांने म्हटले आहे. अंपचद्धा निर्मूलन समितीने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.