कोल्हापूर/ दीपक घाटगे : कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच ठिकाणी राजकीय घडामोडी वेगाने बदलू लागल्या आहेत. सत्ताधारी, विरोधक, आणि स्थानिक गटांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रत्येक नगरपरिषदेचे चित्र वेगळे असून स्थानिक आघाड्यांमुळे गुंतागुंतीचे चित्र दिसत आहे.कुरुंदवाड नगरपरिषदेवर गेल्या कार्यकाळात राष्ट्रवादीचा प्रभाव राहिला असला तरी शिंदे गटाने गेल्या दोन वर्षांत संघटनशक्ती वाढवली आहे. भाजपा आणि शिंदे गट एकत्र लढल्यास राष्ट्रवादीला मोठं आव्हान निर्माण होईल. या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढतीची शक्यता आहे.मलकापूरमध्ये ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष, भाजपा, प्रभावळे, भोसले आघाडी, शिवसेना ठाकरे गट यांच्यात लढत होणार आहे. पन्हाळ्याचा पारंपरिक गड राखण्याची लढाई या ठिकाणी सुरू आहे. भाजप, जनसुराज्यशक्ती पक्ष मोकाशी गट, भोसले गट, गवंडी, सोरटे, कांबळे गट, अशा लढतीची शक्यता आहे.
मलकापूरमध्ये ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष, भाजपा, प्रभावळे, भोसले आघाडी, शिवसेना ठाकरे गट यांच्यात लढत होणार आहे. पन्हाळ्याचा पारंपरिक गड राखण्याची लढाई या ठिकाणी सुरू आहे. भाजप, जनसुराज्यशक्ती पक्ष मोकाशी गट, भोसले गट, गवंडी, सोरटे, कांबळे गट, अशा लढतीची शक्यता आहे. गडहिंग्लजमध्ये जनता दल, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात लढत होणार आहे. गडहिंग्लजमध्ये विनय कोरे यांच्या गटाची पकड मजबूत असून भाजप आणि राष्ट्रवादी यांचे स्थानिक नेते याठिकाणी आपापले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत.शिरोळमध्ये स्थानिक नेत्यांच्या प्रभावामुळे तिरंगी लढत अपेक्षित आहे. परंतु महायुती विरोधी महाविकास आघाडी लढतीची शक्यता आहे. हातकणंगलेत महाविकास आघाडी विरोधी शिवसेना शिंदे गट, भाजपा, शिवसेना ठाकरे गट यांच्यात लढतीची शक्यता आहे. हुपरीत श्री अंबाबाई विकास आघाडी, भाजपा, महाविकास आघाडी यांच्यात लढतीची शक्यता आहे. आजरा आणि चंदगड नगरपंचायतींत काँग्रेसचा प्रभाव दिसतोय. परंतु भाजपनो नव्या उमेदवारांसह प्रवेश करून या समीकरणात बदल घडविण्याची रणनीती आखली आहे.
या सर्व ठिकाणी उमेदवारी अर्ज, बंडखोरी, आणि स्थानिक आघाड्या यामुळे वातावरण रंगतदार होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यातील मतदार आता ‘विकास की पक्षनिष्ठा? या द्वंद्वात आहेत. येत्या काही दिवसांत नेत्यांची प्रचारसभा, भेटीगाठी आणि विकासाच्या घोषणांनी कोल्हापूर जिल्हा निवडणुकीच्या रंगात नक्कीच न्हाऊन निघणार आहे.
पेठ वडगावमध्ये स्थानिक आघाड्यांच्यात रंगत होणार आहे. पारंपारिक स्वर्गीय विजयसिंह यादव यांच्या कन्या माजी नगराध्यक्षा विद्या पोळ यांची यादव आघाडी व युवकक्रांतीचे संस्थापक स्वर्गीय शिवाजीराव सालपे यांच्या पत्नी प्रविता सालपे यांची युवक क्रांती आघाडी यांच्यात लढत होणार आहे. पेठ वडगावमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील गटाला लोकसमर्थन वाढत असून, पारंपरिक राजकारणाला पर्याय म्हणून नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू आहे.
कागलमध्ये समरजितसिंह घाटगे विरोधी मंत्री हसन मुश्रीफ गट यांच्यात लढतीची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांचा प्रभाव कायम आहे. तथापि, भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्यास समीकरण बदलू शकते. मुरगूड स्थानिक आघाड्यांच्या गटातटात ही निवडणूक होणार आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजीमुळे तिरंगी लढत अपेक्षित आहे.






