
व्यापाऱ्याची साडेतीन करण्यासाठी काव (ता. चंदगड) यथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी आ. पाटील बोलत होते. यावेळी उसाला किमान ३६०० रुपये दर मिळावा अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील सर्व कारखानदारांशी बैठक घेऊन ऊस दर वाढवून देण्याची – मागणी करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी शांताराम बापू, दिपक पाटील, नाथाजी पाटील, एम. टी. कांबळे, भावकू – गुरव, शंकर मनवाडकर, नाना डसके, अशोक कदम, रविंद्र बांदिवडेकर, संग्राम अडकूरकर, सुरेश हरेर, राम पाटील, भरमु न पाटील, टी. एस. चोरेकर, प्रताप सूर्यवंशी, ओंकार सुळेभावकर उपस्थित होते.
चंदगड मतदार संघातील कारखान्यावर शासनमान्य काटा स्वतः बसविणार
आमदार पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कारखान्यावर शासन मान्य काटा स्वतः बसविण्याचे आश्वासन दिले, मी स्वतः शेतकरीपूत्र असल्याने शेतकऱ्यांसाठी मला चांगल काम करायचं आहे आणि ते करण्यासाठी शासन स्तरावरुनही प्रयत्न करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गडहिंग्लज उपविभागातील काही कारखाने काटामारी करीत असल्याच्या तक्रारी यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. उस वजनात काटेमारी करणाऱ्या साखर कारखानदारांना सोडणार नाही असा इशारा आमदार पाटील यांनी दिला.