
सातारा-कास मार्गावर कास पठार, कास तलाव ही पर्यटन स्थळे येत आहेत. कास तलावाकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक राहते. या निसर्गरम्य परिसरात अनेक हॉटेल असल्याने खवय्यांची देखील गर्दी या मार्गावर नेहमी राहते. अनेकदा स्टंटबाजी करणाऱ्या युवकांची रेलचेल गणेश खिंड परिसर, कास तलावालगत दिसून येते. त्यातच भर की काय पठारावरील अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहेत. बामणोली भागात मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने या मार्गावर संबंधित ठेकेदारांचे मालवाहतूक करणारे ओव्हरलोडेड डंपर सुसाट वेगात धावत आहेत. अशा डंपरवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा तालुका वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
या मार्गावर ओव्हरलोड मालवाहतूक करणारे डंपर अनेकदा बारीक क्रशसेंड वाहून नेत असताना कोणत्याही डंपरवर आच्छादन टाकले जात नाही. त्यामुळे बारीक धूळ वाऱ्याने उडून मागील वाहन चालकांच्या डोळ्यांना त्रास होतो. त्यातून दुचाकी, चार चाकी चालकांचे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. समोरच्या वाहनाची कोणतीही सुरक्षितता न घेता डंपरचालक आपली मुजोरी देखील दाखवतात, त्यामुळे अशा डंपर चालकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
ओव्हरलोड व सुसाट वेगात डंपर यापुढे आढळून आल्यास अशा डंपर चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. यवतेश्वर चेक पोस्टवर अशा डंपरची सातारा तालुका वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून तपासणी देखील केली जाईल.
– निलेश तांबे, पोलिस निरीक्षक, सातारा तालुका पोलिस स्टेशन
Ans: सातारा–कास पर्यटन मार्गावर क्रशसँड व डांबर वाहून नेणारे ओव्हरलोडेड डंपर सुसाट वेगाने धावत असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
Ans: या मार्गावर कास पठार, कास तलाव यासारखी जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे असून निसर्गरम्य परिसर, हॉटेल्स व खाद्यगृहे असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी असते.
Ans: बारीक क्रशसँड वाऱ्याने उडून मागील वाहनचालकांची दृश्यता कमी होते, डोळ्यांना इजा होते व नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता वाढते.