वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तर अक्षरशः वैतागले आहेत. चंदगड तालुक्याला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. घनदाट जंगल संपत्ती, घटप्रभा, ताम्रपर्णी नद्या बारमाही पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच जंगमहट्टी, फाटकवाडी, सोनारवाडी, क्कीकट्टे, जांबरे, काजिर्णे, हेरे, कुदनुर, पाटणे, आदींसह तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील, विधानसभेचे अध्यक्ष नामदार कै. बाबासाहेब कुपेकर आदी नेतेमंडळीच्या प्रयत्नातून पाटबंधारे विभागाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पिण्याच्या, व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्या मुळे शेतक-यांनी मोठ्याप्रमाणात ऊसाच्या पिकांची लागवड केली आहे. तर डोंगर कपारीतील झाडांची ठेकेदारांनी मोठ्याप्रमाणात कत्तल केल्यामुळेच या प्राण्यांनी आता आपला मोर्चा शेतातील उभ्या ऊस, मक्का, भात, नाचणी आदी पिकांकडेआणि गावाच्या दिशेने वळविला आहे.
सद्या ऊसाच्या तोडणीसाठी गावा-गावात टोळ्या सुरू झाल्या आहेत. शेतक-याचे ऊस तोडणी करून गाळपासाठी कारखान्याकडे पाठविले जात आहेत. पण ऊस तोडणीसाठी गेलेल्या फडात हत्ती दिसल्याने मालकांची आणि तोडणी कामगारांची घाबरगुंडी उडाली आहे. तर तुटून गेलेल्या ऊसाच्या खोडव्याला पाणी पाजण्यासाठी शेतात जावे लागते. ऊसा बरोबरच शेतकऱ्यांना चांगला दर देणार पिक म्हणजे काजू होय. काजू झाडांना मोहोर आला असल्यास झाडे सफाईचे काम करावे लागते. मात्र हत्ती, अस्वल, आणि बिबट्याच्या भितीने शेतकऱ्यांनी शिवारात जाणेच टाळले आहे. या वन्यप्राण्यांचा दिवसेंदिवस वाढत चाललेला उपद्रव शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरला आहे. तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Ans: चंदगड तालुक्यात गवे, हत्ती, बिबट्या, वाघ, अस्वल, सांबर, रानडुक्कर आणि वनगायी यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे.
Ans: पूर्व भागातील चिंचणे, कामेवाडी, तेऊरवाडी तसेच पश्चिम भागातील गवसे, इब्राहिमपूर, बुझवडे, कानूर भोगोली, पिळणी, सडेगुडवळे यांसह अडकूर, विंझणे, मोरेवाडी, सोनारवाडी, हेरे, इसापूर, तिलारीनगर, पाटणे, वाघोत्रे, नागवे आदी अनेक गावांमध्ये ही समस्या तीव्र आहे.
Ans: शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतात जाणे धोकादायक झाले असून ऊस, भात, मक्का, नाचणी, काजू यांसारखी पिके धोक्यात आली आहेत.






