Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर UPSTDC कडून ‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेज; मथुरा-वृंदावनसह ब्रजभूमीची सफर

जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने भाविकांसाठी ‘कृष्ण लीला’ विशेष पर्यटन पॅकेज सुरू केले आहे. तीन दिवसांच्या या पॅकेजमध्ये मथुरा, वृंदावन, बरसाना आणि गोवर्धनसह ब्रजभूमीतील प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 12, 2026 | 07:52 PM
जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर UPSTDC कडून ‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेज; मथुरा-वृंदावनसह ब्रजभूमीची सफर

जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर UPSTDC कडून ‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेज; मथुरा-वृंदावनसह ब्रजभूमीची सफर

Follow Us
Follow Us:

जन्माष्टमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळाने (UPSTDC) ‘कृष्ण लीला’ या पर्यटन पॅकेजचा शुभारंभ केला आहे. भाविकांसाठी आध्यात्मिक पर्यटन अधिक सोयीचे आणि परवडणारे व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. तीन दिवस आणि दोन रात्रींच्या या पर्यटन पॅकेजमध्ये मथुरा, वृंदावन, गोकुळ आणि बरसाना या पवित्र स्थळांचा समावेश आहे. दरम्यान ब्रजभूमीतील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. या पर्यटन टूरची सुरुवात सकाळी ८.०० वाजता लखनऊ येथून सुरू होईल.

या उपक्रमाबाबत पर्यटन व संस्कृती मंत्री जयवीर सिंह म्हणाले, “‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेज हे ‘व्हिजिट माय स्टेट उत्तर प्रदेश’ अभियानाच्या उद्दिष्टांना पुढे नेणारे आहे. या माध्यमातून देशभरातील पर्यटकांना राज्याच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाची ओळख करून देण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच कृष्ण-ब्रज पर्यटन मार्गिकेला अधिक बळकटी मिळून भाविकांसाठी तीर्थयात्रआ अधिक सुलभ होईल.”

ते पुढे म्हणाले, “२०२५ मध्ये मथुरेला १०.२४ कोटींहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. तसेच ब्रज रंगोत्सव २०२५ मध्ये ४४ लाखांहून अधिक पर्यटक सहभागी झाले. २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत जवळपास १.९० कोटी पर्यटकांनी ब्रजला भेट दिली आहे. यावरून ब्रज हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय आध्यात्मिक पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून उदयास येत असल्याचे स्पष्ट होते.”

Marathi language: ‘मराठी शिकण्यासाठी’ रिक्षाचालकांकडून ३०० रुपये? आनंद दिघेंच्या नावाचा वापर केल्याचा आरोप

कुटुंबे आणि छोट्या समूहांसाठी हे पर्यटन पॅकेज तयार करण्यात आले आहे. वातानुकूलित सेडान आणि क्रिस्टा वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पॅकेजसाठी किमान दोन पर्यटक आवश्यक आहेत. सेडान वाहनासाठी प्रतिव्यक्ती ₹१०,४००, तर क्रिस्टा वाहनासाठी प्रतिव्यक्ती ₹१०,१५० शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

या पर्यटन पॅकेजमध्ये निवास, नाश्ता, अल्पोपाहार, हाय-टी, मार्गदर्शकासह स्थळदर्शन, स्थानिक प्रवासाची सुविधा तसेच आवश्यक सहाय्यक सेवांचा समावेश आहे. त्यामुळे पर्यटकांना नियोजनबद्ध आणि त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. दुपारचे आणि रात्रीचे भोजन यासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाईल.

तीन दिवसांच्या या पर्यटन कार्यक्रमादरम्यान ब्रजमधील प्रसिद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी वृंदावनमधील बांके बिहारी मंदिर, रंगजी मंदिर, निधिवन, वैष्णो देवी मंदिर आणि अक्षय पात्र मंदिराला भेट दिली जाईल. दुसऱ्या दिवशी मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी, द्वारकाधीश मंदिर, विश्राम घाट, भूतेश्वर मंदिर तसेच गोवर्धन या ठिकाणांना भेट देण्यात येईल.तिसऱ्या दिवशी बरसाना येथील राधाराणी मंदिर, इस्कॉन मंदिर आणि श्री राधा दामोदर मंदिराला भेट दिल्यानंतर लखनऊकडे परतीचा प्रवास सुरू होईल.

Mumbai One App: मेट्रो, लोकल, बससेवा एका ॲपवर; ‘मुंबई वन’वर १.०४ कोटींहून अधिक तिकिटांचे बुकिंग

UPSTDC चे अध्यक्ष अमृत अभिजात म्हणाले, “‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेज पर्यटकांना सुखकर आणि समृद्ध तीर्थक्षेत्राचा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून ब्रज प्रदेशातील आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक समृद्धीची ओळख व्यावसायिक पद्धतीने नियोजित पर्यटन सेवांद्वारे पर्यटकांना करून देण्यात येणार आहे.”

Web Title: Krishna leela tourism package mathura vrindavan upstdc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • Janmashtami news
  • Krishna Janmashtami

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.