‘मराठी शिकण्यासाठी’ रिक्षाचालकांकडून ३०० रुपये? आनंद दिघेंच्या नावाचा वापर केल्याचा आरोप
शिवसेनेचे नेते व पदाधिकारी जयराम मेसे यांच्या माध्यमातून रिक्षा युनियनमार्फत प्रत्येक रिक्षाचालकाकडून ३०० रुपये घेऊन फॉर्म भरून घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेसाठी ज्या संस्थेच्या नावाचा वापर केला जात आहे, तिची नोंदणी, अधिकृत मान्यता किंवा पैसे घेण्याचा अधिकार याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
Wardha News: दीड लाख शेतकऱ्यांच्या पिकांना विमाकवच; कापूस, सोयाबीन, तुरीसह भुईमूग, ज्वारीचा समावेश
याहून गंभीर बाब म्हणजे या उपक्रमासाठी धर्मवीर दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाचा वापर करून रिक्षाचालकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे दिघे यांच्या नावाचा वापर करून आर्थिक व्यवहार केला जात असेल, तर त्यामागील संस्था नेमकी कोणती, तिची कायदेशीर नोंदणी आहे का आणि जमा होणाऱ्या पैशांचा हिशेब कुठे ठेवला जातो, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मराठी भाषेचे ज्ञान रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी आवश्यक करण्यामागे प्रवाशांशी सुसंवाद वाढवणे आणि महाराष्ट्रातील भाषिक व्यवहार अधिक सक्षम करणे हा उद्देश आहे. मात्र, या निर्णयाच्या नावाखाली रिक्षाचालकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्यास त्याची अधिकृत पावती, शुल्क निश्चित करणारा शासन आदेश आणि संबंधित संस्थेची नोंदणी याबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे.
रिक्षाचालकांकडून ३०० रुपये नेमक्या कोणत्या कारणासाठी घेतले जात आहेत, त्याची पावती दिली जाते का, संबंधित संस्थेला परिवहन विभागाची मान्यता आहे का आणि आनंद दिघे यांच्या नावाचा वापर करण्यास परवानगी आहे का, याबाबत प्रशासनाने स्पष्टता देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या आरोपांबाबत जयराम मेसे तसेच संबंधित रिक्षा युनियनची अधिकृत बाजू समोर आलेली नसल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे.
Mumbai One App: मेट्रो, लोकल, बससेवा एका ॲपवर; ‘मुंबई वन’वर १.०४ कोटींहून अधिक तिकिटांचे बुकिंग





