Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lonavala Tiger Point Road News:लोणावळ्यातील वाहतूक कोंडी फुटणार; कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती!

लोणावळा नगरपरिषद हद्दीत रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित जागांचे लवकरात लवकर भूसंपादन करून त्या जागा पीएमआरडीएच्या ताब्यात देण्याबाबतही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांना स्पष्ट सूचना करण्यात आल्या.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 12, 2026 | 03:31 PM
Maval, Lonavala, Sunil Shelke, PMRDA, Tourism, Maharashtra News,

Maval, Lonavala, Sunil Shelke, PMRDA, Tourism, Maharashtra News,

Follow Us
Follow Us:
  • कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्ता ७ मीटर रुंद करून काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश
  • आमदार सुनील शेळके व पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी यांच्याकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी
  • लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांना भूसंपादन प्रक्रिया जलद करण्याचे आदेश
Satish Gade, Maval News: मावळ तालुक्यातील पर्यटन विकासाला अधिक गती देतानाच पर्यटकांची वाहतूक कोंडीतून सुटका करून स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. कुरवंडे येथील टायगर व लायन्स पॉईंट विकास आराखड्यातील विविध कामांची पीएमआरडीएचे महानगर आयुक्त अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. यावेळी कुमार चौक ते टायगर पॉईंट या महत्त्वाच्या रस्त्याचे काम ७ मीटर रुंदीने वेगाने सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर वाढणारी पर्यटकांची संख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी आमदार सुनील शेळके सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही महत्त्वपूर्ण स्थळ पाहणी करण्यात आली. कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याचे काम वेगाने पूर्ण झाल्यास टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटसह परिसरातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.

DY Chandrachud Latest News: डी. वाय. चंद्रचूड यांची मोठी आंतरराष्ट्रीय नियुक्ती; रशिया-युक्रेन वादात भूषवणार लवादाची भूमिका

लोणावळा नगरपरिषद हद्दीत रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित जागांचे लवकरात लवकर भूसंपादन करून त्या जागा पीएमआरडीएच्या ताब्यात देण्याबाबतही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांना स्पष्ट सूचना करण्यात आल्या. त्यामुळे रस्त्याच्या कामातील अडथळे दूर होऊन विकासकामाला गती मिळण्याची शक्यता आहे.

मावळचा पर्यटन विकास हा केवळ पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यापुरता मर्यादित न राहता स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरावा, हा आमदार सुनील शेळके यांचा प्रयत्न आहे. पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते सुकर झाले, वाहतूक कोंडी कमी झाली आणि पर्यटकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळाली, तर मावळमध्ये नव्या पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्यातून हॉटेल, चहापानगृहे, स्थानिक खाद्यपदार्थ, वाहतूक, छोटे व्यावसायिक तसेच पर्यटनाशी संबंधित विविध व्यवसायांना चालना मिळून स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा या विकासकामामागील व्यापक उद्देश आहे.

IndiGo Flight Emergency Landing : इंडिगो विमानाचे इंजिन हवेतच बंद पडले अन् 224 प्रवासी …; इंजिनमध्ये बिघाड

‘मावळचा पर्यटन विकास अधिक गतिमान करणे, पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देणे आणि स्थानिकांना पर्यटनातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे’ हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आमदार सुनील शेळके यांच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे. प्रशासनातील विविध विभागांशी समन्वय साधून रखडलेली कामे मार्गी लावण्यावर त्यांचा भर असून, टायगर व लायन्स पॉईंट परिसरातील रस्ते आणि पर्यटन सुविधांच्या विकासामुळे मावळच्या पर्यटनाला नवी झळाळी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या पाहणी दौऱ्यावेळी पीएमआरडीएच्या सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहआयुक्त हिम्मत खराडे, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title: Kumar chowk to tiger point road widening mla sunil shelke pmrda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 03:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.