Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kurla best bus service: कुर्ल्यातील बेस्ट बस सेवा आजही बंदच, प्रवाशांची पायपीट; प्रवासासाठी ‘या’ मार्गांचा वापर करा

कर्ला बस स्थानकातून आज अंधेरी, वांद्रे आणि सांताक्रुझसाठी कोणत्याही बस धावणार नाही. बेस्ट बस सेवा बंद असल्यामुळे कामावर जाणारे प्रवासी तसेच शाळा कॉलेजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 11, 2024 | 10:30 AM
Kurla best bus service: कुर्ल्यातील बेस्ट बस सेवा आजही बंदच, प्रवाशांची पायपीट; प्रवासासाठी 'या' मार्गांचा वापर करा

Kurla best bus service: कुर्ल्यातील बेस्ट बस सेवा आजही बंदच, प्रवाशांची पायपीट; प्रवासासाठी 'या' मार्गांचा वापर करा

Follow Us
Close
Follow Us:

सोमवारी 9 डिसेंबर रोजी रात्री कुर्ला येथे बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-332 चा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून 42 जण जखमी झाले. जखमींना भाभा हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर काल मंगळवारी कुर्ल्यातील बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. त्यानंतर आज बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी कुर्ल्यातील बेस्ट बस बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे आज देखील प्रवाशांना पायपीट करावी लागणार आहे.

कर्ला बस स्थानकातून आज अंधेरी, वांद्रे आणि सांताक्रुझसाठी कोणत्याही बस धावणार नाही. बेस्ट बस सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. कामावर जाणारे प्रवासी तसेच शाळा कॉलेजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बेस्ट बस सेवा बंद असल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारी झालेल्या भीषण अपघाताचा परिणाम बस सेवेवर झाला आहे.  (फोटो सौजन्य – pinterest)

Mahavikas Aghadi News: EVM विरोधातील लढाई तीव्र होणार; महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

जाणून घ्या पर्यायी मार्ग

अंधेरी, वांद्रे आणि सांताक्रुझसाठी बस सेवा बंद राहणार असली तरी देखील प्रवाशांसाठी काही पर्यायी मार्गांची सोय करण्यात आली आहे. 37, 320, 319, 325, 330, 365 आणि 446 या बस सेवा आज कुर्ला बस स्थानकातून सुरु राहणार आहेत. सांताक्रुझ स्टेशन ते कुर्ला स्टेशन हा बस मार्ग देखील सुरु राहणार आहे, मात्र यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. 311, 313 आणि 318 च्या बसेस टिळक नगर यु टर्न घेऊन कुर्ला स्टेशनला न जाता सांताक्रुझ स्टेशनला जाणार आहेत. बसमार्ग 310 बसेस टिळक नगर पुल येथे यु टर्न घेऊन बांद्रा बस स्टेशनला जाणार आहेत.

काय आहे प्रकरण

मुंबईतील कुर्ला येथे सोमवारी रात्री बसचा भीषण अपघात झाला. ही बस बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या अंतर्गत येते. कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर या ठिकाणी हा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 42 जण जखमी झाले. जखमींना भाभा हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीत धुसफूस: विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस ठाकरे-गटात वादाची ठिणगी

बेस्च बस चालक संजय मोरे यांनी मद्यपान केल्यामुळे हा अपघात झाल्याचा संशय अनेकांकडून व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालकाने मद्यपान केले नव्हते. मात्र चौकशीत असं समोर आलं आहे की, संजय मोरे इलेक्ट्रीक बसच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे अस्वस्थ होते. यापूर्वी संजय मोरे यांनी खासगी कंत्राटदाराच्या मॅन्युअल ट्रान्समिशन बस चालवल्या होत्या.

मात्र ते पहिल्यांदाच इलेक्ट्रीक बस चालवत होते, आणि यामुळे गोंधळून गेले होते. ऑटोमॅटिक वाहनात क्लच नसल्यामुळे बस चालवताना त्यांचा गोंधळ उडाला आणि हा अपघात झाला. संजय मोरे यांनी देखील याप्रकरणी कबुली दिली आहे. या सर्व प्रकरणानंतर संजय मोरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना 11 दिवसांची पोलीस कोठडीही सुनवण्यात आली.

Web Title: Kurla best bus service is close today know about the alternative ways for travelling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 10:27 AM

Topics:  

  • Marathi News

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.