Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण

शिर्डीत गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. अशातच, पूनमनगर येथे मुस्लिम धर्मगुरू दानिश नफीज चौधरी यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला आहे. चला या घटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 23, 2026 | 08:26 PM
फोटो सौैजन्य: X.com

फोटो सौैजन्य: X.com

Follow Us
Follow Us:

सारी बाबांच्या शिर्डीत गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असतानाही गुन्ह्यांच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. शनिवारी रात्री निवासी भागातील पूनमनगर येथे मुस्लिम धर्मगुरू दानिश नफीज चौधरी यांच्यावर अज्ञात तिघांनी प्राणघातक हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मौलाना चौधरी हे संध्याकाळी नमाजपठणासाठी जात असताना श्रीरामनगर पोलिस चौकीच्या मागील भागात तिघांनी त्यांना अडवले. नाव विचारल्यानंतर अचानक चाकूने वार करण्यात आला. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या डोक्यावर व पायावर दगड मारत दुचाकीवरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच नमाजासाठी आलेल्या शेकडो मुस्लिम बांधवांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मौलाना चौधरी यांना तातडीने रुग्णवाहिकेतून Saibaba Super Speciality Hospital येथे दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून उपचार सुरू आहेत.

Amravati News: बँकेतून १३ लाखांचे सोने गायब!, निर्मल उज्ज्वल सोसायटीत मोठी खळबळ

घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिस ठाण्याचे उपअधीक्षक अमोल भारती, पोलिस निरीक्षक रणजित गलांडे व सहायक पोलिस निरीक्षक निवांत जाधव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकारी Somnath Gharage (पोलिस अधीक्षक) आणि Somnath Wakchaure (अप्पर पोलिस अधीक्षक) यांनीही घटनेची गंभीर दखल घेत आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.

दरम्यान, घटनास्थळाजवळील पोलिस चौकी बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. तसेच नगरपरिषदेने बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याने तपासात अडचणी निर्माण होत आहेत. यापूर्वीही याच परिसरात भाविकांच्या लुटीच्या घटना घडल्या होत्या. ताज्या हल्ल्यामुळे पूनमनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आल्याने हा परिसर काही अंशी असामाजिक तत्वांचा अड्डा बनल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

Purvanchal Expressway सुसाट बसच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले अन्..; 5 जण जागीच ठार, 16 जखमी

अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी केले आहे.

नगरपरिषदेवर हलगर्जीपणाचा आरोप

या घटनेत सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आल्याने नगरपरिषद प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. तसेच रस्त्यावरील बंद दिव्यांबाबतही तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Ahilyanagar crime muslim clerics attacked with knives in shirdi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • shirdi
  • shirdi news

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
2

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
3

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
4

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.