रक्षाबंधन होऊनही अंगणवाडीसेविका अद्यापही 'त्या' भत्त्याच्या प्रतिक्षेत; मिळतीये 'तारीख पे तारीख'
Ladki Bahin Yojna: महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ला आता जवळपास एक वर्ष झाले. गेल्या वर्षभरात लाखो महिलांच्या खात्यावर या योजनेचे पैसेही जमा झाले.2024 मध्ये महाराष्ट्रात ही योजना मोठ्या धुमधडाक्यात लागू करण्यात आली होती. पण गेल्या चार-पाच महिन्यांपासून या योजनेतील नियमांत बदल करण्यात आले. त्यानंतर योजनेतून अनेक महिलांची नावे वगळण्यात आली. सुरूवातीला सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत गेला. मात्र आता या योजनेत केलेल्या बदलांमुळे अनेक महिलांची नावे काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता अद्यापही अनेक लाभार्थींच्या खात्यात जमा झालेला नाही, यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सध्या सरकारकडून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. या प्रक्रियेनंतर अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. जर तुमच्या खात्यातही जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल, तर तुमचे नाव यादीतून वगळण्यात आले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं नाव अजूनही यादीत आहे की नाही, हे तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
सुरुवातीला या योजनेसाठी पात्रतेचे निकष खूप शिथिल होते, त्यामुळे लाखो महिलांनी अर्ज केला. मात्र, युती सरकार आल्यावर पात्रतेसंदर्भात नव्याने नियम ठरवण्यात आले.
सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
काही महिलांनी चुकीची माहिती दिल्याचं उघड झालं.
याशिवाय आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक निकषांनुसारही नव्याने छाननी सुरू आहे.
त्यामुळे जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि हप्ता अद्याप मिळालेला नसेल, तर आजच यादीत तुमचं नाव तपासा आणि आवश्यक असल्यास स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.