(फोटो सौजन्य: Instagram)
शेतकरी आणि वासराचं प्रेम हे फार निराळं असत. आपल्या मुलावर जितकं प्रेम असत, तितकंच प्रेम एक शेतकरी एका वासरावर करत असतो. अन्नदात्याला त्याच्या कामात गाई म्हशींची फार मदत होते अशात शेतकरी त्यांचे हाल होऊ देत नाही. सध्या पावसाळा सुरू आहे अशात संपूर्ण वातावरण हे थंडगार झालेलं असत. आपण तर आपल्या घरात गोधडी घेऊन बसतो पण त्या प्राण्यांचं काय जे गोठ्यात बांधलेले असतात. गोठा बाहेर असल्याकारणाने थंडीची लाट तिथेही पसरते आणि माणसांना जशी थंडी वाजते तशीच थंडी प्राण्यांनाही वाजते. अनेकदा मालकाचे आपल्या प्राण्यांकडे दुर्लक्ष होते मात्र सध्याच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचे अनोखे प्राणी प्रेम दिसून आले.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक गोंडस वासरू दिसून येत आहे. व्हिडिओची खासियत म्हणजे यात वासराला पोत्याचा रेनकोट घातल्याचे दिसून आले. थंडीच्या या वातावरणात वासराला थंडी वाजू नये म्हणून काळजीने शेतकऱ्याने हा रेनकोट बनवला. व्हिडिओत वासराच्या डोक्यावर पोत्यापासून तयार केलेली एक सुंदर टोपी घातलेली दिसून आली. या रेनकोटमध्ये खुलून आलेलं वासराचं देखणं रूप आणि शेतकऱ्याची माया पाहून सर्वच सुखावले आणि लोकांनी हा व्हिडिओ वेगाने शेअर करायला सुरुवात केली. रेनकोट घातलेल्या या वासराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @marathi_newspaper नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शेतकरी दादा तुझ्या प्रेमाला तोड नाही…धन्य आहे तुजी माया” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काय रूपडं बनवलयं देवानं …… व्वा ( राजा माझा शेतकरी)” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूप छान आणि खरंच गरज आहे मुलं जनावर आहे ते थंडीत गारठणार त्यामुळे तुम्ही योग्य केले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.