Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराडच्या कांबिरवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; दोन शेळ्या केल्या फस्त

आतापर्यंत बिबट्याचं अस्तित्व आहे का नाही, याबाबत ग्रामस्थांच्यात शंका होती. तर्कवितर्क लढवले जात होते. गुरुवारी कांबीरवाडीत बिबट्याने शेळी चारावयास गेलेल्या महिलेच्या देखतच शेळीवर हल्ला केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2025 | 11:37 AM
कराडच्या कांबिरवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; दोन शेळ्या केल्या फस्त

कराडच्या कांबिरवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; दोन शेळ्या केल्या फस्त

Follow Us
Close
Follow Us:

मसूर : कांबिरवाडी (मसूर, ता.कराड) परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालावयास सुरुवात केली आहे. बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली. गावानजीकच्या शिवारात बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे. वनविभागाने तातडीने पावले उचलत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कांबीरवाडी नजीकच्या शिवारात दोन दिवसांपूर्वी जयहिंद म्हाकू पडळकर यांची बिबट्याने शेळी ठार केली. गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास युवराज परदेशी यांच्या पत्नी मळवी नावाच्या शिवारात शेळ्या चरावयास गेल्या होत्या. त्यांच्या डोळ्यादेखत बिबट्याने एका शेळीवर झडप टाकून ती ठार केली. बिबट्याने हल्ला केलेला पाहताच त्या ओरडल्या. त्यांच्या ओरडण्याने ग्रामस्थ जमा झाले. तोपर्यंत बिबट्याने धूम ठोकली.

आतापर्यंत बिबट्याचं अस्तित्व आहे का नाही, याबाबत ग्रामस्थांच्यात शंका होती. तर्कवितर्क लढवले जात होते. गुरुवारी कांबीरवाडीत बिबट्याने शेळी चारावयास गेलेल्या महिलेच्या देखतच शेळीवर हल्ला केल्याने बिबट्या परिसरात वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. शेतात कामासाठी जाण्यास घाबरत आहेत.

मसूर परिसरात आधी नव्हता बिबट्याचा वावर

मसूर परिसरात या अगोदर बिबट्याचा वावर नव्हता. आता भक्षाच्या शोधार्थ बिबट्याने या परिसरात पाऊल टाकले आहे. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्या उसात लपण्याची शक्यता आहे. अशी भीती लोकांच्यामध्ये आहे. परिसरात ऊसतोड सुरू आहे. लोकांसह ऊस तोडणी कामगार शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील चितळी गावात मयूर दत्तात्रय वाघ यांची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी रोड काकडाई मंदिराजवळ आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेश मयूर वाघ या बालकावर घराशेजारी असलेल्या डाळींबाच्या बागेतून दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत क्षणार्धात त्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन धूम ठोकली.

Web Title: Leopard attack in kambirwadi in karad nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • Karad news
  • Leopard Attack

संबंधित बातम्या

मोठी बातमी! बिबट्यांचा धोका कमी होणार; केंद्र सरकारने दिली ‘या’ कृतीला मान्यता
1

मोठी बातमी! बिबट्यांचा धोका कमी होणार; केंद्र सरकारने दिली ‘या’ कृतीला मान्यता

Ahilyanagar News: बिबटयांना पकडा म्हणजे आम्ही अंगणात खेळू शकू, देवठाणच्या विद्यार्थ्यांची भाबडी विनंती
2

Ahilyanagar News: बिबटयांना पकडा म्हणजे आम्ही अंगणात खेळू शकू, देवठाणच्या विद्यार्थ्यांची भाबडी विनंती

सवलतीच्या आमिषाने शेकडो नागरिकांना लाखोंचा गंडा; संतप्त नागरिकांनी अखेर दुकानाचे कुलूपच तोडले अन्…
3

सवलतीच्या आमिषाने शेकडो नागरिकांना लाखोंचा गंडा; संतप्त नागरिकांनी अखेर दुकानाचे कुलूपच तोडले अन्…

घरातच बसा! पुणे, अहिल्यानगरपाठोपाठ ‘या’ जिल्ह्यात झाले बिबट्याचे दर्शन; Forest Department चे दुर्लक्ष
4

घरातच बसा! पुणे, अहिल्यानगरपाठोपाठ ‘या’ जिल्ह्यात झाले बिबट्याचे दर्शन; Forest Department चे दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.