अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची हालचाली वाढत आहेत. यावरच उपाय म्हणून वनविभागातर्फे 'एआय वाईल्ड नेत्र' ही सौरउर्जेवर चालणारी अत्याधुनिक सायरन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
मानवी वसाहतींमध्ये वाघ आणि बिबट्यांचा वावर वाढू लागल्यामुळे या दोन प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात मागील दहा महिन्यांत 47 जणांचा बळी गेला आहे, तर वनविभागाच्या डायरीत पाच वर्षात 377 लोकांचा मृत्यू झाल्याची…
राज्यभर बिबट्याची दहशत वाढत जात आहे. कोकण, पुणे, नाशिकनंतर आता कल्याणमध्ये देखील बिबट्याचा वावर आढळला आहे. तालुक्यातील वसद गावात बिबट्याने गाईच्या वासरांचा फडशा पडला.
पारगावतर्फे आळे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका 8 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
वनपुरी परिसरात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असल्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्या अनुषंगाने वन विभागाने तातडीने पिंजरा बसविला आहे.
Nagpur Leopard News : नागपूरमधील पारडी येथे तीन दिवसांपासून बिबट्याचा कहर पाहायला मिळत होता. लोकांमध्ये भितीचे वातावरण होते. अखेर बिबट्या जेरबंद करण्यात आले.
गोंदिया जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय रुची पारधीचा मृत्यू झाला. वडिलांसोबत शेतात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीती व संताप पसरला आहे.
ज्यभर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. याला अपवाद महाबळेश्वर देखील नाही. गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी आणि भोसे या परिसरात बिबट्याची दहशत वाढत जात आहे.
बिबट्याच्या मुक्त वावरामुळे भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अँड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निरावागज परिसरातून मंगळवारपासून एक ७५ वर्षीय वृद्ध महिला अचानक बेपत्ता झाली आहे. शेतात फिरत असताना, अचानक ही महिला गायब झाल्याने या वृद्ध महिलेचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले आहे.
बारामती तालुक्यातील निरावागज परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्तपणे संचार आढळल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे.
ऊसाच्या शेतासह आता रानावनात आणि अगदी गावात बिबटे हल्ला करत आहेत. पुण्यातील औंध भागामध्ये देखील बिबट्या दिसला असल्याचे बोलले जात आहे. वडगाव मावळमध्ये देखील बिबट्या दिसून आला आहे.
मागील काही वर्षांपासून भीमा नदीकाठावर कानगाव हातवळण व नानगाव परिसरात बिबट्यांची हालचाल सुरू होती. काटेरी झुडपे व उसाच्या शेतात त्यांनी ठाण मांडले होते.