Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजापूर तालुक्यात विहिरीत पडला बिबट्या, वनविभाग आणि ग्रामस्थांकडून सुरक्षित सुटका

ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या बिबट्याच्या सुरक्षित सुटकेसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. पहिल्या वेळी बिबट्याने पिंजऱ्याच्या दरवाजाची दोरी तोडल्याने पिंजऱ्याचा दरवाजा थेट विहिरीत खोल पडला. अनेक प्रयत्नानंतर बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केल्यानंतर त्याला दहाच्या आसपास सुरक्षितपणे विहिरी बाहेर काढण्यात आले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 05, 2024 | 11:19 AM
राजापूर तालुक्यात विहिरीत पडला बिबट्या, वनविभाग आणि ग्रामस्थांकडून सुरक्षित सुटका
Follow Us
Close
Follow Us:

राजापूर : गावाच्या ठिकाणी अनेक प्राणी आढळत असतात, अनेक वेळा ते प्राणी रात्री त्याच्या बिळातून बाहेर निघत असतात. आता रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यातील एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, राजापूर तालुक्यातील नाटे बांधकर वाडी येथे पहाटे पाचच्या सुमारास सुरेश स्थळेश्री यांच्या बागेतील विहिरीत बिबट्या पडला होता. ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाला कळविले वनविभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सकाळी आठच्या सुमारास पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत ग्रामस्थांनी बिबट्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या बिबट्याच्या सुरक्षित सुटकेसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. पहिल्या वेळी बिबट्याने पिंजऱ्याच्या दरवाजाची दोरी तोडल्याने पिंजऱ्याचा दरवाजा थेट विहिरीत खोल पडला. यादरम्यान बिबट्या पिंजऱ्यावर चढून वरती उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण विहिरीला वरून जाळी लावण्यात आली होती.

ग्रामस्थांच्या सहकार्याने पाण्यात पडलेला दरवाजा बाहेर काढल्यानंतर पुन्हा एकदा पिंजरा पाण्यात सोडण्यात आला. अनेक प्रयत्नानंतर बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केल्यानंतर त्याला दहाच्या आसपास सुरक्षितपणे विहिरी बाहेर काढण्यात आले. विहिरीत बिबट्या पडल्याची बातमी पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बघ यांनी गर्दी केली होती यामध्ये महिला मोठ्या प्रमाणावर दिसत होत्या. सागरी पोलीस ठाणे नाट्याचे कर्मचारी देखील घटनास्थळी उपस्थित होते. वनविभागाचे अधिकारी पोलीस कर्मचारी आणि काही जबाबदार नागरिक वारंवार उपस्थितांना त्याचे आव्हान करत होते.

बिबट्याला पिंजऱ्यातून सुरक्षित बाहेर काढल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे आणि त्यानंतर त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Leopard fell into a well in rajapur taluka forest department and villagers rescued it safely

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 11:16 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.