Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रायगड जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेला यश; १५१ रुग्णांची ओळख

leprosy detection campaign २३ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी, संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क.

  • By Dilip Bane
Updated On: Dec 18, 2025 | 04:27 PM
leprosy, Raigad leprosy

leprosy, Raigad leprosy

Follow Us
Close
Follow Us:
  • यामध्ये ६१ संसर्गजन्य आणि ९० असंसर्गजन्य रुग्णांचा समावेश आहे.
  • मोहीम १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आली.
  • जिल्हाभरात ५ लाख २२ हजारांहून अधिक घरांची तपासणी करण्यात आली.
  • एकूण २३ लाख २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांची शारीरिक तपासणी झाली.
रायगड जिल्ह्यात कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने राबवलेली विशेष शोध मोहीम यशस्वी ठरली आहे. या व्यापक अभियानादरम्यान जिल्ह्यातील विविध भागांत एकूण १५१ कुष्ठरोगग्रस्त रुग्ण आढळून आले असून, त्यामध्ये ६१ संसर्गजन्य आणि ९० असंसर्गजन्य रुग्णांचा समावेश आहे.ही मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी आणि सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. प्राची नेहलकर यांच्या मार्गदर्शनाखाली १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आली.

राज्यात कुष्ठरोग शोध अभियान! १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी

या कालावधीत आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील ५ लाख २२ हजारांहून अधिक घरांना भेटी देत प्रत्यक्ष तपासणी केली. या सर्वेक्षणात तब्बल २३ लाख २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांची शारीरिक तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान संशयास्पद लक्षणे आढळलेल्या २२ हजार ६२४ नागरिकांची वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून सखोल तपासणी करण्यात आली. त्यातून १५१ जणांना कुष्ठरोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

या मोहिमेचा मुख्य उद्देश आजाराचे लवकर निदान करून अपंगत्व टाळणे, तसेच समाजातून कुष्ठरोगाचा प्रसार पूर्णपणे रोखणे हा आहे. शहरी आणि ग्रामीण भागात एकाच वेळी सर्वेक्षण राबवून प्रशासनाने आरोग्याबाबतची सजगता दाखवली आहे.आढळलेल्या सर्व रुग्णांवर शासकीय आरोग्य संस्थांमार्फत मोफत उपचार सुरू करण्यात आले असून, नियमित तपासणी, समुपदेशन आणि आवश्यक मार्गदर्शन दिले जात आहे. वेळेत उपचार घेतल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो आणि अपंगत्व टाळता येते, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

या अभियानाच्या यशासाठी आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे मोठे योगदान लाभले, असे प्रशासनाने सांगितले.दरम्यान, त्वचेवर पांढरे किंवा लाल डाग दिसणे, बधिरपणा, जखमा उशिरा भरणे किंवा संवेदना कमी होणे अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कुष्ठरोगाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून रुग्णांबाबत सहानुभूती, स्वीकार आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचेही आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

डोलोचा ओव्हरडोस कराल अन् आणखीन आजारी पडाल! लिव्हरचं होईल रामनाम

💡

Frequently Asked Questions

  • Que: रायगडमध्ये कुष्ठरोग शोध मोहीम का राबविण्यात आली?

    Ans: कुष्ठरोगाचे लवकर निदान करून अपंगत्व रोखणे आणि जिल्ह्यातून आजाराचे उच्चाटन करणे हा या मोहिमेचा उद्देश होता.

  • Que: संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य कुष्ठरोगात काय फरक आहे?

    Ans: संसर्गजन्य कुष्ठरोग उपचार न घेतल्यास पसरू शकतो, तर असंसर्गजन्य कुष्ठरोग इतरांना लागत नाही.

  • Que: कुष्ठरोगाची लक्षणे कोणती?

    Ans: त्वचेवर पांढरे किंवा लाल डाग, बधिरपणा, जखमा उशिरा भरणे, संवेदना कमी होणे ही प्रमुख लक्षणे आहेत.

  • Que: कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो का?

    Ans: होय, वेळेत निदान व योग्य उपचार केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो.

  • Que:

    Ans:

Web Title: Leprosy detection campaign succeeds in raigad district151 patients identified

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 04:27 PM

Topics:  

  • raigad

संबंधित बातम्या

Raigad Zilla Parishad: रायगडमध्ये राजकीय गणित बिघडले! महायुतीतच घमासान, मित्रच झाले प्रतिस्पर्धी
1

Raigad Zilla Parishad: रायगडमध्ये राजकीय गणित बिघडले! महायुतीतच घमासान, मित्रच झाले प्रतिस्पर्धी

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे
2

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग
3

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Raigad Zilla Parishad: उरण तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी; ७ फेब्रुवारीला होणार मतदान
4

Raigad Zilla Parishad: उरण तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी; ७ फेब्रुवारीला होणार मतदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.