Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Zilla Parishad: उरण तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी; ७ फेब्रुवारीला होणार मतदान

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उरण तालुक्यात जोरात सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 02, 2026 | 03:08 PM
Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा परिषद निवडणुकीत उरणमध्ये चुरस रंगली 
  • रविवारी सुट्टीचा प्रचाराला झाला फायदा
  • उरण पंचायत समिती निवडणूक रंगात
 

Raigad Zilla Parishad: रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उरण तालुक्यात जोरात सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

१ फेब्रुवारी हा रविवार सुट्टीचा दिवस असल्याने उरण तालुक्यातील चिरनेर, जासई, नवघर व चाणजे या चार जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये प्रचाराला वेग आला आहे. भाजप, महाविकास आघाडी, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच शिवसेना (शिंदे गट) या पक्षांचे उमेदवार घरोघरी प्रचार फेऱ्या, मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या चार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आठ मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Raigad News: पनवेलचा महापौर १० तारखेला ठरणार! महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी विशेष सभेचे आयोजन

उरण तालुक्यातील चिरनेर, जासई, नवघर व चाणजे या चार जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शेकाप व काँग्रेस यांची महाविकास आघाडी असा सरळ सामना रंगणार आहे. मात्र आवरे पंचायत समिती गणातून मनसेने, चाणजे पंचायत समिती गणातून शिवसेना (शिंदे गटाने), तर केगाव व नवघर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. उरण पंचायत समितीच्या चार गणांमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

एकूणच रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रत्येक गाव, आदिवासी वाड्या-वस्त्यांमध्ये प्रचार रॅल्या, मतदारांच्या भेटीगाठी तसेच जेवणावळीचे आयोजन केल्याचे दिसून येत आहे. आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, उरण तालुक्यातील चारही जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

Karjat News : निवडणूक प्रचाराचा गैरफायदा घेत अनधिकृत बांधकामधारकांचा सुळसुळाट; नेमकं प्रकरण काय ?

दरम्यान, भेडखळ, जासई, चिरनेर व विधाणे या पंचायत समितीच्या चार गणांमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा बेट सामना होणार आहे. भाजपचे आमदार महेश बालदी व माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मात्र या चारही जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये आजही शिवसेना (उबाठा गट), शेकाप व काँग्रेसची मजबूत पकड असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Fierce contest in uran taluka amid intense campaigning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • raigad
  • Uran
  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

Raigad News: विद्यार्थिनींचा व्हायरल व्हिडिओ ठरला प्रभावी; खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात
1

Raigad News: विद्यार्थिनींचा व्हायरल व्हिडिओ ठरला प्रभावी; खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

Raigad News: रायगड जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या रखडल्या; विकास निधीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
2

Raigad News: रायगड जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या रखडल्या; विकास निधीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा
3

Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा

Raigad News: पराभवानंतरही ओझर्डेंची सामाजिक बांधिलकी कायम; गणेशभक्तांसाठी पुन्हा मोफत एसटी सेवेची घोषणा
4

Raigad News: पराभवानंतरही ओझर्डेंची सामाजिक बांधिलकी कायम; गणेशभक्तांसाठी पुन्हा मोफत एसटी सेवेची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.