मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली
मनोज जरांगे यांचे दौरै वाढले असून आज ते बीड दौऱ्यावर असताना दुर्घटना घडली. मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात असून लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. यातून मनोज जरांगें सुखरुप बचावले आहेत. मात्र एका क्षणासाठी सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांनी बीड शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेट दिली. यावेळी, अचानक लिफ्ट बिघडल्याने अपघात घडला. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट खाली कोसळली. मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी दरवाजा तोडून बाहेर पडले.
लोखो मराठी कार्यकर्त्यांचा मनोज जरांगे यांच्यावर मोठा विश्वास आहे. त्यामुळे कार्यकर्ते त्यांची काळजी घेत असतात. त्यांच्यासोबत पोलिस सुरक्षा देखील असते. जरांगेंच्या प्रत्येक हालचालीकडे सर्वांचं लक्ष असतं. गेल्या काही दिवसांपासून ते बीडमधील विविध घटनांवरून कारवाई करण्यसाठी सरकार व पोलीस प्रशासनाकडे मागणी करत आहेत. ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
Nashik Accident: भीषण अपघात! वयोवृद्ध महिलेला ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू
जरांगे त्यांच्या सहकाऱ्यांसह बीड शहरामधील शिवाजीराव हॉस्पिटलमध्ये गेले होते. हॉस्पिटलमधील लिफ्टने वरच्या मजल्यावर जात होते. मात्र तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लिफ्ट मध्येच बंद पडली. मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी ज्या लिफ्टमध्ये होते, ती लिफ्ट मध्येच अडकली.आज दुपारी अडीचच्या सुमरास ही घटना घडली.
लिफ्ट मध्येच अडकल्यांनतर कोणाला काही समजण्याच्या आत लिफ्ट कोसळली आणि पहिल्या मजल्यावरून थेट खाली जाऊन आदळली. यात मनोज जरांगे पाटील यांना दुखापत झाल्याची माहिती आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावं यांसाठी मनोज जरांगे पाटील गेली दोन वर्षे लढा देत आहेत. याच मागण्यांसाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने त्यांचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला आधीपेक्षा जास्त संख्येने मराठा समाज सामील होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.