Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Cylinder Crisis: गॅस सिलिंडर बुकिंगसाठी नवी नियमावली: दुहेरी कनेक्शन असलेल्या ग्राहकांवर होणार परिणाम

एलपीजी वितरकांकडून पुरवठा खंडित झालेला नाही. मात्र एलपीजी बुकिंगमध्ये काहीशी घट दिसून आली आहे. काल सुमारे ७७ लाख बुकिंग नोंदली गेली, तर १३ मार्च २०२६ रोजी ही संख्या ८८.८ लाख होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 16, 2026 | 11:16 AM
एलपीजीचे ११ हजार टन उत्पादन वाढले

एलपीजीचे ११ हजार टन उत्पादन वाढले

Follow Us
Close
Follow Us:
  • युद्धामुळे अनेक देशांमध्ये एलपीजी, एसपीजी गॅस आणि पीएनजी गॅस पुरवठ्याचा तुटवडा
  • पुरवठा स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले
  • औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना होणारा पुरवठा सुमारे ८० टक्क्यांपर्यंत नियंत्रित
LPG Cylinder New Rules: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 16 वा दिवस असून भारतासह जगभरातील अनेक देशांना या युद्धाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. या युद्धामुळे अनेक देशांमध्ये एलपीजी, एसपीजी गॅस आणि पीएनजी गॅस पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात तर एलपीजी गॅस सिलिंडरचाही तुटवडा निर्माण झाला आहे. संपूर्ण देशात तणाव वाढत चालली आहे. खेड्यापांसून मोठमोठ्या शहरांमध्येही सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लागल्यामुळे एक तणावची परिस्थिती आहे. अशातच केंद्र सरकारने आता गॅस सिलिंडरबाबत नवीन नियमावली जारी केली आहे. यामुळे ज्यांच्याकडे गॅसचे दुहेरी कनेक्शन आहे. त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

देशातील पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीचा पुरवठा स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसारस एलपीजी सिलिंडर आणि पीएनजी चा पुरवठा नियमित पुरवठा आणि वितरण योग्य रित्या होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केलं आगे. सरकारकडून घरगुती आणि अत्यावश्यक सेवांसाठी सिलिंडरचा पुरवठा करुन देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे केंद्र सरकारने म्हटलं आहे.

Pune Metro Expansion: पुणे मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्व तेल शुद्धीकरण कारखाने पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत असून कारखान्यांकडे पुरेसा तेलाचा साठाही शिल्लक आहे. आपला देश पेट्रोल आणि डिझेल उत्पादनात स्वयंपूर्ण असून देशांतर्गत पेट्रोल डिझेलची मागणी पूर्ण करण्यासाठी इंधानाची आयात करण्याची आवश्यता नाही. त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.

पीएनजी – सीएनजी  (PNG_CNG)

देशात पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा शंभर टक्के सुरू आहे. मात्र औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना होणारा पुरवठा सुमारे ८० टक्क्यांपर्यंत नियंत्रित करण्यात येत आहे. प्रमुख शहरे आणि शहरी भागातील व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना पीएनजी कनेक्शन घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी ग्राहक ई-मेल, पत्र किंवा सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (सीजीडी) कंपन्यांच्या ग्राहक पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात.

एलपीजी  (LPG)

एलपीजी वितरकांकडून पुरवठा खंडित झालेला नाही. मात्र एलपीजी बुकिंगमध्ये काहीशी घट दिसून आली आहे. काल सुमारे ७७ लाख बुकिंग नोंदली गेली, तर १३ मार्च २०२६ रोजी ही संख्या ८८.८ लाख होती. ऑनलाइन एलपीजी सिलिंडर बुकिंगचे प्रमाण ८४ टक्क्यांवरून सुमारे ८७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. बिहार, दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानसह अनेक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार बिगर-घरगुती एलपीजीचे वाटप करण्याचे आदेश जारी केले आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर प्राधान्याने वितरणासाठी राज्य सरकारांकडे ठेवण्यात आले असून ते आता ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ग्राहकांना उपलब्ध आहेत.

Middle East War : होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका? ट्रम्प यांनी ‘या’ सात देशांसोबत केली गुप्त चर्चा

पेट्रोल – डिझेल (Petrol – Diesel)

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची साठवणूक तसेच काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारांकडून कडक अंमलबजावणी उपाययोजना करण्यात येत आहेत. एलपीजी सिलिंडरची साठवणूक आणि काळाबाजार रोखण्यासाठी आंध्र प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये छापे टाकण्यात येत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांचे अधिकारी सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि अनियमितता रोखण्यासाठी एलपीजी वितरण केंद्रांवर प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करत आहेत.

गॅस सिलिंडर (LPG Cylinder)

१४ मार्च २०२६ रोजी केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. पीएनजी ग्राहकांना त्यांचे घरगुती एलपीजी कनेक्शन परत करावे लागणार आहे. तसेच पीएनजी ग्राहकांसाठी नवीन एलपीजी कनेक्शन देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सिलिंडर बुकिंगच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. शहरी भागात २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांचा बुकिंग कालावधी अनिवार्य करण्यात आला आहे.

रॉकेल :
गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पर्यायी इंधन म्हणून रॉकेलचे वितरण सुरू केले आहे. पर्यायी इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ४८ हजार किलोलिटर रॉकेलचे अतिरिक्त वाटप करण्यात आले आहे. एलपीजी पुरवठ्यावरील ताण कमी करण्यासाठी हॉस्पिटॅलिटी आणि रेस्टॉरंट्ससह काही क्षेत्रांमध्ये रॉकेल आणि कोळसा यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापर करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

 

Web Title: Lpg cylinder crisis long queues across india new rules for double connection holders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • LPG Shortage

संबंधित बातम्या

LPG Gas Shortage: ग्रामीण भागातील हॉटेलवर पेटल्या चूली; गॅस मिळत नसल्याने व्यावसायिकांचे हाल, रोजगाराचा प्रश्न
1

LPG Gas Shortage: ग्रामीण भागातील हॉटेलवर पेटल्या चूली; गॅस मिळत नसल्याने व्यावसायिकांचे हाल, रोजगाराचा प्रश्न

LPG Shortage : गँस सिलेंडरसाठी धावाधाव…! गँस सिलेंडरने जाग्या केल्या कोरोनातील आठवणी
2

LPG Shortage : गँस सिलेंडरसाठी धावाधाव…! गँस सिलेंडरने जाग्या केल्या कोरोनातील आठवणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.