Middle East War : होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका? ट्रम्प यांनी 'या' सात देशांसोबत केली गुप्त चर्चा (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
तसेच आता त्यांनी होर्मुझ खाडी सुरक्षित करणार असल्याचेही म्हटले आहे. यासाठी ट्रम्प काही देशांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करत असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षा कायम राखण्यासाठी मित्रराष्ट्रांकडे मदतीची मागणी केली आहे. असे न झाल्यास नाटोचे अस्तित्व धोक्यात येईल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
रविवारी (१५ मार्च २०२६) एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की, होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी सध्या ते सात प्रमुख राष्ट्रांशी चर्चा करत आहेत. यामध्ये चीन(China), फ्रान्स(France), जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन (Britain) यांसारख्या देशांचा समावेश आहे.
ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेने गेल्या अनेक दशकापासून या मार्गाचे रक्षण केले आहे, पण आता इतर देशांनी स्वत:च्या हितासठी पुढे यावे. अमेरिकेला या मार्गावर केवळ १% तेल मिळते, तर चीनसारख्या देशांना ९०% तेल याच मार्गाने मिळते. यामुळे अमेरिकेनेच रक्षण का करावे? असा प्रश्न ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे.
ट्रम्प यांच्या या आवाहनाला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, होर्मुझमध्ये त्यांच्या युद्धनौका पाठवणार नाहीत. तर जर्मनीने देखील यासाठी नकार दिल आहे. ब्रिटनने देखील गेल्या आठवड्यात मदत उशिरा पाठवल्याच्या भूमिकेवर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटले की, दोन आठवड्यांपूर्वी गरजेच्या वेळी ब्रिटनने जहाजे पाठवण्यास नकार दिला आणि आता आम्ही शत्रूला कमकुवत केल्यानंतर ते मदतीचा प्रस्तावर देत आहेत. पण आम्हाला गरज नाही. संकटकाळात कोणी मदत केली नाही, हे अमेरिका लक्षात ठेवेल. असेही ट्रम्प यांनी कडाडून म्हटले.
Middle East War : मध्यपूर्वेतील युद्धाचा ऑस्ट्रेलियाला फटका; चीनने घेतला ‘हा’ कठोर निर्णय
Ans: ट्रम्प होर्मुझ स्ट्रेट पुन्हा सुरक्षित आणि खुला करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी ७ महत्त्वपूर्ण देशांसोबत चर्चा केली असून या देशांना युद्धनौका पाठवून या मार्गाच्या सुरक्षेत मदत करण्याचे आवाहन केले आहे.
Ans: ट्रम्प यांनी म्हटले की, जर NATO देशांनी अमेरिकेला मदत केली नाही, तर भविष्यात नाटोच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यांनी मित्रदेशांनी सुरक्षा मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.






