Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : वाहतूकदारांचा साताऱ्यात बेमुदत संप; E-challan विरोधात उठवला आवाज

Satara News : ई-चलनाच्या अन्यायी पद्धती विरोधात महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट्स ॲक्शन कमिटी (M-TAC) च्या नेतृत्वाखाली ५ मार्च २०२६ पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 05, 2026 | 03:21 PM
M-TAC protests in Satara against unfair e-challan system Satara News

M-TAC protests in Satara against unfair e-challan system Satara News

Follow Us
Close
Follow Us:

Satara News : सातारा : ई- चलनाच्या अन्याय स्वरूपाच्या दंड वसुलीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य मालवाहतूक संघटनेने 5 मार्चपासून बेमुदत राज्यव्यापी बंद पुकारला आहे.(Transport News) त्या बंदचे साताऱ्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. मालवाहतूक खाजगी ट्रॅव्हल्स तसेच वाहतूकदार संघटनांनी राजवाडा ते पवई नाका यादरम्यान वाहनांची रॅली काढून निषेध नोंदवला. (Satara News)

यासंदर्भात राज्य वाहतूक संघटनेच्या समन्वय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-चलनाच्या अन्यायी पद्धती, दंडाची अवाजवी रक्कम आणि मनमानी कारवाईच्या विरोधात महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट्स ॲक्शन कमिटी (M-TAC) च्या नेतृत्वाखाली ५ मार्च २०२६ पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू झाला आहे. यात ट्रक, टेम्पो, टॅक्सी आणि खाजगी बस अशा लाखो वाहनांचा समावेश असल्याने, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : “AI च्या बाता करणाऱ्या सरकारला…”, मेळघाटातील समस्यांवरून यशोमती ठाकूर यांची टीका

संपाच्या पहिल्या दिवशीच मालवाहतुकीची चाके थांबल्याने पश्चिम महाराष्ट्रातील मालवाहतूक पुरवठा प्रभावित झाला आहे पाच जिल्ह्यातून साधारण हजार पेक्षा अधिक वाहने रस्त्यावर ठिकठिकाणी उभी राहिल्याने दळणवळण सुद्धा ठप्प झाले आहे. साताऱ्यात खाजगी वाहतूक ट्रॅव्हल संघटनेने या बंदला प्रतिसाद म्हणून आपल्या गाड्या बंद ठेवत ई चलनाच्या संदर्भात शासनाने स्वीकारले धोरण रद्द करावे अशी मागणी केली. मालवाहतूक संघटना जिल्हा समन्वय समिती सातारा व खाजगी ट्रॅव्हल्स संघटनेच्या वतीने विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये तातडीची बैठक घेण्यात आली. जोपर्यंत राज्य शासन यासंदर्भात निर्णय घेत नाही तोपर्यंत हा बंद तीव्र गतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे देखील वाचा : मी परत आलोय…! Ratnagiri जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस; आतापर्यंत तब्बल…

सातारा लोणंद रस्त्यावर रस्त्याची एक बाजू वाहनांनी पूर्णपणे व्यापली होती. प्रत्येक बसवर काळे झेंडे लावण्यात येऊन राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. राज्य वाहतूक कृती समितीचे जिल्हा समन्वयक अक्षय गवळी यांनी शासनाच्या ई चलनधोरणा संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे वाहन चालकांना भुर्दंड बसत असून ई चलनाच्या नियम भंगप्रकरणी दाखल खटले तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात तातडीने धोरणात्मक निर्णय व्हावा अन्यथा आंदोलनाची धार वाढवावी लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

संपाची प्रमुख कारणे आणि मागण्या

  • ई-चलनाचा सुळसुळाट: चुकीची ई-चलने रद्द करून सध्याची प्रणाली बंद करण्याची प्रमुख मागणी आहे.
  • ४५ दिवसांचा नियम: ई-चलन ४५ दिवसांत न भरल्यास परवाना व फिटनेस प्रमाणपत्रावर निर्बंध आणण्याच्या नवीन नियमाला विरोध आहे
  • अवाजवी दंड: वाहतूकदारांकडून ई-चलनाच्या नावाखाली छळ होत असल्याचा आरोप आहे .
  • इतर मागण्या: शहरांमधील ‘नो एन्ट्री’चे निर्बंध आणि अनावश्यक सुरक्षा उपकरणांची सक्ती यावरही आक्षेप आहे

    हा संप बेमुदत असून, जोपर्यंत सरकार ई-चलन प्रणालीत सुधारणा करत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहील, असा इशारा वाहतूकदार संघटनांनी दिला आहे .

Web Title: M tac protests in satara against unfair e challan system satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.