Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kunal Kamra Intrim Bail: मद्रास उच्च न्यायालयाकडून कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर

न्यायालयाने त्यांच्या विरोधात प्राथमिक स्वरूपाचा गुन्हा असल्याचे नमूद केले, मात्र राजकीय दबावाचाही विचार करता त्यांच्या सुरक्षिततेसाठी अंतरिम संरक्षण मंजूर केले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 29, 2025 | 11:15 AM
Kunal Kamra Intrim Bail: मद्रास उच्च न्यायालयाकडून कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर
Follow Us
Close
Follow Us:

चेन्नई: मद्रास उच्च न्यायालयाने स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या विडंबनात्मक गाण्यावरून त्याच्यावर हा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारने कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर  इतर शोसाठी तो पुद्दुचेरीला निघून गेला. पण मुंबई पोलिसांनी विनोदी कलाकार कुणाल कामराविरुद्ध समन्स जारी केले होते, ज्यावर त्यांनी एका आठवड्याची मुदत मागितली होती. मात्र, पोलिसांनी त्यांच्या या अपीलाला नकार दिला आहे.

कामराच्या वकिलाने खार पोलिस ठाण्यात जाऊन त्यांच्या उत्तराची हार्ड कॉपी सादर केली आणि चौकशीसाठी एका आठवड्याची मुदत मागितली होती. मात्र, पोलिसांनी ही मागणी फेटाळून लावत, ठरलेल्या वेळेनुसारच हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर  कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी अर्ज केला होता.

West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात हिंसाचार; ३४ जणांना अटक, इंटरनेटही बंद

त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने,  कुणाल कामरा यांच्या सुरक्षेला संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी  महाराष्ट्रातील न्यायालयात जाणे सुरक्षित नाही, असा निर्वाळा देत त्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. मुंबई पोलिसांकडून होणाऱ्या अटकेच्या शक्यतेपूर्वीच  कुणाल कामरा यांनी मद्रास उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.  न्यायालयाने त्यांच्या विरोधात प्राथमिक स्वरूपाचा गुन्हा असल्याचे नमूद केले, मात्र राजकीय दबावाचाही विचार करता त्यांच्या सुरक्षिततेसाठी अंतरिम संरक्षण मंजूर केले आहे.

 अंतरिम जामीनानंतरही मुंबईतील खार पोलिस ठाण्यात त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कामराविरुद्ध दाखल तक्रारींपैकी एक जळगाव शहराच्या महापौरांनी केली आहे, तर दुसरी नाशिकमधील एका हॉटेल व्यावसायिकाने दिली आहे. खार पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून त्यांनी कामराला चौकशीसाठी दोनदा समन्स पाठवले आहे. पहिल्या समन्सनंतर कामराने एका आठवड्याची मुदत मागितली होती, मात्र पोलिसांनी ती फेटाळली. त्यानंतर दुसऱ्या समन्सद्वारे ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.

जीव इतका स्वस्त नाही! आयुष्याला कंटाळून व्यक्तीने भररस्त्यात अंगावर ओतलं पेट्रोल, शेवट पाहून अश्रू अनावर

प्रकरण काय आहे?
विनोदी कलाकार कुणाल कामराने त्याच्या स्टँड-अप शो दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध एक टिप्पणी केली होती ज्यामुळे राजकीय वर्तुळात वादळ निर्माण झाले होते. विनोदी कलाकाराने विडंबन गाण्यात शिंदे यांच्याविरुद्ध ‘देशद्रोही’ हा शब्द वापरला होता. गाण्याचे बोल काहीसे असे होते, ‘मेरी नजर से तुम देखो तो गद्दर नजर वो आये.’ येथूनच संपूर्ण वाद सुरू झाला ज्यामुळे शिवसैनिकांनी अलीकडेच मुंबईतील हॅबिटॅट हॉटेलची तोडफोड केली कारण कुणाल कामराचा स्टँड-अप शो त्याच हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता.

 

 

 

Web Title: Madras high court grants interim bail to kunal kamra nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 09:25 AM

Topics:  

  • Kunal Kamra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.