(फोटो सौजन्य – X)
बदलत्या काळाबरोबरच लोकांचे आयुष्य, राहण्याच्या पद्धती, लोकांची विचारसरणी यात बरेच बदल घडून आले. जग तर पुढे जात नाही पण या जगात माणूस कुठे तरी हरवून जात आहे. मागील काही काळापासून आत्महत्येचे प्रमाण फार वाढले आहे. आपल्या जीवनाला कंटाळून अनेकजण आत्महत्येचा पर्याय निवडतात आणि स्वतःचे अस्तितवच मिटवून टाकतात. सोशल मीडियावर प्रकार दिसून आले आहेत. अशा घटनांचे अनेक व्हिडिओजही इथे बऱ्याचदा शेअर केले जातात. आताही इथे अशाच एका घटनेने नोंद घेतली आहे. यातील दृश्ये इतकी भावुक आहेत की ती पाहून तुम्हाला अश्रू अनावर होतील. नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
मानसिक तणावामुळे अनेकजण आपला जीव संपवण्याचा निर्णय घेतात. आजच्या या घटनेतही असेच काहीसे घडले. आयुष्याला कंटाळलेला व्यक्ती थेट रस्त्याच्या मधोमध उभा राहून आपला संपवण्याचा प्रयत्न करू लागला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध उभा आहे. त्याला पाहून तो वाईट परिस्थितीत असल्याचे जाणवते. यावेळी अनेक लोक आजूबाजूला उभे असून त्याच्याकडे एकटक नजरेने पाहत असतात, मात्र कुणीही यावेळी त्याची विचारपूस करत नाही.
पुढच्याच क्षणी आपण पाहू शकतो की, व्यक्ती आपल्या अंगावर थेट पेट्रोल ओतून घेतो. यावेळी सर्व लोक त्याच्याकडे बघत असतात मात्र कुणीही पुढे जाऊन पुढाकार घेत नाही आणि सर्वजण हा तमाशा खुल्या डोळ्यांनी पाहत असतात. यानंतर व्यक्ती आपल्या खिशातून लायटर काढून स्वतःला आग लावण्याचा प्रयत्न करत असतो मात्र तितक्यात समोरून एक मुलगा त्याच्याजवळ येतो आणि त्याला धीर देतो. व्यक्ती मुलाला मिठी मारतो आणि ढसाढसा रडायला लागतो. हे दृश्य फारच हृदयस्पर्शी वाटते. या घटनेचा व्हिडिओ व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोक यातील दृश्ये पाहून भावुक झाले असून अनेकजण आजुबाजुंच्या लोकांनी व्यक्तला का मदत केली नाही यावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @marathiveda नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जर तुम्हाला इतरांच्या वेदना जाणवत असतील तर तुम्ही माणूस आहात’ असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मानलं भावा तुला एखाद्या चा जीव वाचविलासं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तमाशा बघणारे नालायक लोकं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “लाज वाटायला पाहीजे बाकीचे लोक फक्त पाहत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.