Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी सज्ज; तिसरा पर्याय देणार?

सातारा नगरपालिकेच्या रणांगणात शडू ठोकण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सातारकरांना तिसरा पर्याय देण्याबाबत विचार मंथन करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 17, 2022 | 01:36 PM
सातारा नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी सज्ज; तिसरा पर्याय देणार?
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा नगरपालिकेच्या रणांगणात शडू ठोकण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सातारकरांना तिसरा पर्याय देण्याबाबत विचार मंथन करण्यात आले.

सातारकरांसाठी आजही तिसरा पर्याय उभा न राहिल्याने राजधानीच्या निवडणुकीचा सामना राजे विरुद्ध राजे असाच राहिला आहे. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही राजे भाजपवासी झाल्याने पालिकेचा गड काबीज करण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व अपक्षांनीही देखील मोट बांधली आहे.

साताऱ्यात बुधवारी आमदार शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याची प्रचिती आली. साताऱ्यातील अनेक प्रश्न आजवर सुटलेले नाहीत. जनतेला पर्याय हवा आहे. सातारकरांना पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी, जनतेच्या विकासासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी यंदा तिसरा पर्याय निर्माण करण्याची गरज असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

या मागणीला सर्वांनी दुजोरा दिला. या निर्णयामुळे सातारा पालिकेची यंदाची निवडणूक रंगतदार होणार असून, खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले काय रणनीती आखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या बैठकीला माजी उपनगराध्यक्ष ऍड. बाळासाहेब बाबर, शहर सुधार समितीचे अस्लम तडसरकर, ज्ञानदेव कदम, विजया निकम, प्राध्यापक विक्रांत पवार, शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, प्रणव सावंत, माजी नगरसेवक अमर गायकवाड, गिरीश मोडकर, स्नेहा अंजलकर, सलीम कच्छी, अमित कदम, अमृता पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Maha vikas aghadi ready for satara municipality election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2022 | 01:35 PM

Topics:  

  • Shashikant Shinde
  • उदयनराजे भोसले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.