केळघर पंचायत समिती सदस्य अतिष कदम यांची निष्ठा शशिकांत शिंदे, ऋषिकांत शिंदे याच्यावर अधिक आहे. सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर अतिश कदम चांगलेच चमकलेले पाहायला मिळाले, मात्र नुसतीच चमकोगिरी करणाऱ्या कदमांना…
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे कार्यकर्त्यांचं म्हणावं तितकं बळ तालुक्यात दिसून येत नाही. त्यांच्याच गटातील काही कार्यकर्ते हे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना काही प्रमाणात पडद्याआडून सहकार्य करत असल्याचे राजकीय चित्र पाहायला…
आखाडे हे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे होमपीच मानले जाते. त्यामुळे येथील ठराव हा शिंदे यांच्या बाजूनेच होणार अशी राजकीय चर्चा गेले काही दिवसांपासून रंगत होती. दोन्ही बाजूंनी संचालकांना सहलीवर…
मेढा सेंटर विकास सेवा सोसायटीच्या बँक ठरावावरून मोठी राजकीय चुरस रंगली. अखेर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने ८ विरुद्ध ५ अशा बहुमताने डॉ. रामदास वांगडे यांच्या नावाचा ठराव मंजूर करत…
सातारा मतदान केंद्रावर खासदार उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्या गळाभेटीने राजकीय चर्चांना उधाण आले. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान झालेल्या कानगोष्टींमुळे अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील तीन आमदारांनी भाजप समर्थित उमेदवाराला पाठिंबा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. या आमदारांवरील कारवाईबाबत निवडणुकीनंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या…
सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या विजयासाठी शशिकांत शिंदे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून सत्ताधाऱ्यांवर पैशाच्या बळावर राजकारण केल्याचा आरोप केला आहे.
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून लाडकी बहीण योजनेवरून चर्चा सुरु आहेत. राज्य सरकारने राज्यातील ८० लाख महिला या योजनेस अपात्र असल्याचे ठरवत त्यांचे नाव योजनेतून काढून टाकले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस…
Shashikant Shinde News: शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषद निवडीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर टीका केली. शेतकरी मदत आणि पोटनिवडणुकीबाबत त्यांनी मांडलेली सविस्तर भूमिका वाचा
अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी आमची वाटचाल असेल, असे सूचक वक्तव्य केले गेले आहे.
सातारा जिल्ह्यात महायुतीला टक्कर देण्यासाठी भाजपा वगळून समविचारी पक्षांशी युती करून निश्चित चांगली लढत देऊ, असा आत्मविश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
पालिका व नगरपंचायत निवडणुका समविचारी व मित्र पक्षांनासोबत घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अचानक संधी मिळून आलेले काही लोकांनी राजकारणाचा स्थर घसरवला आहे, यापुढे आम्ही कोणत्याही नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही. सांगलीत सुरुवात झाली आहे. आता महराष्ट्रभर सत्तेची मस्ती उतरवू, असा इशारा देण्यात…
सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सर्व निकष व नियम बाजूला ठेवत संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, अशी ठाम मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शेतकरी, बेरोजगारी, आरक्षण आणि विकासाच्या मुद्द्यांवर सरकारवर जोरदार टीका केली.
पुणे आणि मुंबईसह 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या अतिवृष्टीच्या पावसामुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी या दोन्ही राजांच्या नोंदणीकृत आघाड्या आहेत. दोन्ही आघाड्यांकडून स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण अशा दोन्ही लढतींचा प्रस्ताव दिला जाईल. राजकीय महत्त्वकांक्षा कोणाच्याच लपून राहिलेल्या नाहीत.