Maha Vikas Aghadi starts claiming the post of Leader of Opposition in Maharashtra Assembly
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. महायुतीचे सरकार राज्यामध्ये दुसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत असून यामधून सर्वसामान्य जनतेला मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत. राज्यातील महिलांना, तरुणांना आणि शेतकऱ्यांना राज्याच्या या अर्थसंकल्पामधून कोणत्या योजना मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अर्थमंत्री अजित पवार हे येत्या 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत
विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये अजित पवार हे अर्थसंकल्पाचे वाचन करणार आहेत. विधीमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते देखील उपस्थित राहिले आहेत. सत्ताधारी नेत्यांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर फोटोशूट देखील झाले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. आता विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप विधानसभेमध्ये विरोधीपक्षनेता नसल्यामुळे याबाबत निर्णय घेण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल पूर्णपणे एकतर्फी लागल्यामुळे राज्यामध्ये महायुतीचे सरकार आले. मात्र महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यामुळे त्यातील कोणत्याच मित्रपक्षाला विरोधी पक्षनेतापद मिळवता येईल एवढे देखील जागा मिळल्या नाहीत. यामुळे राज्याला विरोधीपक्षनेता मिळालेला नाही. आता मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून महाविकास आघाडीकडून विरोधीपक्षनेते पदावर दावा केला जात आहे. ठाकरे गट आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षांनी यावर दावा केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विधानसभेच्या विरोधीपक्षनेते पदावर दावा केला आहे. ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दावा करताना सांगितले की, विरोधी पक्षनेतेपदावर आमचा हक्क आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदाला मोठी परंपरा आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी चोख कामगिरी पार पाडलेली आहे. तुम्ही निवडून आलेला आहात, तुमचा विजय संशायस्पद असला तरीही विधानसभेत विरोधीपक्षनेता असल्याशिवाय लोकशाही विधिमंडळ पक्षला दिशा सापडणार नाही. मंत्र्यांची मनमानी चालू राहिल. भ्रष्टाचारी मोकाट सुटतील. त्यांना वेसण घालण्यासाठी विरोधी पक्षाची तरतूद करण्यात आलेली आहे” असे मत खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ठाकरे गटाचे प्रयत्न सुरु
विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाचे मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु आहे. निकाल हाती आल्यापासून ठाकरे गट विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदासाठी प्रयत्नशील आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते पद देखील ठाकरे गटाकडे आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्याचबरोबर आता ठाकरे गटाला विधानसभेचे देखील पद हवे आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीन ते चार वेळा भेट घेतली आहे. यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी देखील विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे.