Dhananjay Munde Resignation BJP MLA Suresh Dhas Reaction Maharashtra Political News
बीड : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजलेले संतोष हत्त्या प्रकरण ताजे असतानाच आमदार सुरेश धस यांनी आणखी एक खून प्रकरण समोर आणले आहे. दूध व्यावसायिक असलेल्या कन्हेरवाडीचे महादेव मुंडे यांचा भररस्त्यात परळी तहसील समोर भोसकून खून केला. यामध्ये सुरेश धस यांनी नव्याने अनेक गौप्यस्फोट केले असून पहिल्यांदाच आकाच्या मुलाचं नाव घेतलं आहे. तसंच पुढच्या तीन ते चार दिवसात आरोपींना अटक झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाल्मिक कराड यांच्या मुलाचं थेट नाव घेतलं
एका पोलीस अधिकाऱ्याने केला सखोल तपास
महादेव मुंडे हे दुधाचा व्यवसाय करायचे. पाच ते सहा जणांनी या व्यक्तीला जीवे मारलं. परळी पोलीस ठाण्याचे सानप नावाचे पोलीस अधिकारी यांनी याचा प्रामाणिकपणे तपास करीत याची सखोल चौकशी केली. महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपींची नावे सानप यांनी शोधली होती. मात्र, थेट आकांनी त्यांना पकडायचे नाही, असे सांगितले. त्याऐवजी राजाभाऊ फड आणि अजून दोन-चार जणांना अटक करण्याचे सांगितले. पण सानप यांनी त्यास नकार दिला. पुढे सानप यांच्यावर दबाव टाकण्यात आला. पुढे स्वत:हून त्यांनी बदली करून घेतली. मुंडे यांच्या खुनाची घटना 23 ऑक्टोबर 2023 रोजी झाली. या घटनेतील सर्व आरोपी आकाचे चिरंजीव सुनिल कराड यांच्या अवतीभोवती फिरत असतात. रोजच हे त्यांच्यासोबत असतात. अजूनही या आरोपींना अटक करण्यात आलेलं नाही, असा आरोप सुरेश धस यांनी केला.
महादेव मुंडेचा चाकू भोसकून खून
महादेव मुंडे यांची हत्याप्रकरणात पुढच्या दोन ते तीन दिवसांत आरोपी सापडतात की नाही ते बघा. या महादेव मुंडे यांना जीवे मारून टाकण्यात आलं. यातील आरोपी अटक व्हायला नकोत का? या माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही. त्याला भोकसून खल्लास करण्यात आलं. त्यांचा रतिबाचा धंदा होता. एवढ्या गरीब माणसाला मारून टाकण्यात आलं.
आरोपी सुनिलच्या आजूबाजूला फिरत आहेत
या माणसाला मारून टाकून अमूक-अमूक व्यक्तीला आरोपी करू का, राजाभाऊ फड यांचे नाव घ्या असे सांगितले जात होते. राजाभाऊ फड हे विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणार होते. या प्रकरणातील आरोपींना पकडू नका असे आकाने सांगितले होते. हेच आरोपी आकाच्या मुलाच्या आजूबाजूला फिरत आहेत. आकाचा मुलगा सुनिल आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे आरोपी सुनिलच्या आजूबाजूला फिरत आहेत. महादेव मुंडे यांनी यांचं नेमकं काय काप केलं होतं? याची मला कल्पना नाही. मात्र त्या लोकांनी महादेव मुंडेला मारलं हे मात्र निश्चित, असा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केला.