Maharashtra Monsoon Alert: आज काय खरं नाही! राज्यातील 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार; पुढील चार दिवस...
IMD Alert to Maharashtra: राज्यात गेले दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसाने जोरदार बॅटिंग सुरू ठेवली आहे. काल अनेक जिल्ह्यात पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले. तर आज देखील हवामान विभागाने राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर आज कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट देण्यात आला आहे ते जाणून घेऊयात.
गेले काही दिवस कोकण किनारपट्टी, घाटमाथा, तर पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील चार दिवस रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.