Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा; लाखो लोकं होणार सहभागी, खारघर आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर जय्यत तयारी

कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सुनियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 16, 2023 | 09:16 AM
आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा; लाखो लोकं होणार सहभागी, खारघर आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर जय्यत तयारी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज राज्य शासनाचा प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार. यासाठी नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघर (Kharghar) येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदान येथे भव्य दिव्य सोहळ आयोजीत करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी सुमारे वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक, श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करण्यात आलं आहे.

[read_also content=”बर्थडे सेलिब्रेशनचा भयानक अंत! प्रेयसीने आधी कापला केक, नतंर प्रियकराने त्याच चाकुने चिरला तिचा गळा https://www.navarashtra.com/crime/a-man-killed-his-girlfriend-after-celebrating-her-birthday-in-banglore-nrps-385187.html”]

खारघर येथे सोहळ्याची जय्यत तयारी

खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदान हा पुरस्कार सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास हा सोहळा होणार आहे. त्यासाठी महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य इत्यादी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि श्री सदस्य त्यासाठी परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. या महासोहळ्याची जय्यत तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वत: दोन वेळेस सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्याच्या आयोजनात सहभागी अधिकारी, कर्मचारी, श्री सदस्य यांना सोहळा यशस्वीतेसाठी आवाहन केलं आहे.

वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार

या सोहळ्यासाठी सुमारे वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक, श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजनपूर्वक काम सुरू आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहन तळ, वाहतुक सुरळीत राहण्यासाठीचे नियोजन याकडे लक्ष देण्यात येत आहे. नागरिकांना रेल्वे स्थानकापासून ते सोहळ्याच्या ठिकाणी नेण्यासाठी बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सोहळ्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे 250 टॅंकर आणि 2100 नळ बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय सुविधा देखील तैनात करण्यात आली असून 69 रुग्णावाहिका, 350 डॉक्टर्स, 100 नर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. 32 फिरते शौचालय, 4200 पोर्टेबल शौचालय, कार्यक्रमस्थळी 9000 तात्पुरते शौचालय बांधण्यात आली आहेत. स्वच्छता व्यवस्थेसाठी 60 जेटींग मशीन, 4000 सफाई कर्मचारी शिवाय 26 अग्निशमन वाहने उपलब्ध आहेत. पार्कींगसाठी 22 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी 600 स्वयंसेवक, 200 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: Maharashtra bhushan award ceremony today preparation done at kharghar international corporate ground nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2023 | 08:55 AM

Topics:  

  • appasaheb dharmadhikari
  • maharashtra bhushan award

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.