Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खारघरमध्ये रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान होणार; गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, किती लोकं येणार माहितेय का?

महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च मानला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे. या सोहळ्याला साधारण २० लाखांपेक्षा श्रीसदस्य उपस्थित राहणार आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Apr 12, 2023 | 08:59 AM
खारघरमध्ये रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान होणार; गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, किती लोकं येणार माहितेय का?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) काही दिवसांपूर्वी घोषित झाला आहे. दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM) यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची काही दिवसांपूर्वी भेट घेत, त्यांचे अभिनंदन केले होते. त्यानंतर आता ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार १६ एप्रिल (रविवारी) रोजी खारघरमध्ये हा पुरस्कार सोहळा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून, शहांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं समजते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा यापूर्वी घेतला आहे.

२० लाखांपेक्षा अधिक लोकं येणार…

दरम्यान, या कार्यक्रमाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च मानला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे. या सोहळ्याला साधारण २० लाखांपेक्षा श्रीसदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याचे नियोजन नीट असावे, सुरक्षा कटेकोट असावी, पोलिस बंदोबस्त तैनात असावा, आदीच्या तयारीची बैठक घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळं या कार्यक्रमाला राज्यभरातून धर्माधिकारी यांचे अनुयायी येणार आहेत.

कोण आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी?

डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म १४ मे १९४६ रोजी झाला. रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी गेले ३० वर्षे निरुपण करत असून, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठकी सुरू केल्या. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे कार्यही केले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडे संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही केले जाते. निर्माल्यातून खतनिर्मिती करून पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी १९४३ सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.

Web Title: Maharashtra bhushan awarded to appasaheb dharmadhikari in kharghar on sunday home minister amit shah cm dcm will be present do you know how many people will come

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2023 | 08:58 AM

Topics:  

  • appasaheb dharmadhikari

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.