Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“काँग्रेस पक्षाने त्यांना काय दिलं नाही? दोनवेळा मुख्यमंत्री बनवलं; त्यांच्याकडे पक्ष सोडल्याचे एकही कारण नाही”; महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा हल्लाबोल

आज कॉंग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची बाजू मांडली. भाजप प्रवेशावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी संताप व्यक्त केला. रमेश चेन्नीथला यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित होते.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 13, 2024 | 04:49 PM
Ramesh Chennithala criticized Ashok Chavan

Ramesh Chennithala criticized Ashok Chavan

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. “मी आपल्याला इथे एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो, अशोक चव्हाण यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसमधून कुणीही भाजपात जाणार नाही. काँग्रेस एकजुटीने महाराष्ट्रात काम करणार आहे. जे लोकं काँग्रेस सोडून जात आहेत त्यांच्यासोबत कुणीच उभं राहणार नाही. त्यांच्यासोबत महाराष्ट्राची जनतादेखील उभी राहणार नाही. कार्यकर्ताही सोबत राहणार नाही.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीसुद्धा घेतली भेट

अशोक चव्हाण परवा दुपारी तीन वाजेपर्यंतच्या बैठकीत आमच्यासोबत होते. त्यांनी कोणतीच गोष्ट आम्हाला सांगितलं नाही. ते दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटले होते. तसेच दिल्लीतील आमच्या काही नेत्यांना भेटले होते. तिथून ते परत आले. इथे आमच्यासोबत बैठकीत बसले होते. त्यांनी काँग्रेस पक्ष का सोडला? याचं त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही”, असं रमेश चेन्नीथला म्हणाले.

काँग्रेसने त्यांच्यावर अन्याय केला का

“काँग्रेसची नीती चुकीची आहे का, काँग्रेसने त्यांच्यावर अन्याय केला आहे का, हे त्यांनी स्पष्ट करायला हवं होतं. काँग्रेस पक्षाने त्यांना काय दिलं नाही? त्यांना दोनवेळा मुख्यमंत्री बनवलं. ते 15 वर्ष मंत्री राहीले. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बनले. तसेच ते प्रदेशाध्यक्ष देखील राहीले आहेत. मी युवक काँग्रेसचे अध्यक्ष होतो. माणिकरावर ठाकरे इथे अध्यक्ष होते. मी त्यांना युवक काँग्रेसचा महाराष्ट्र अध्यक्ष बनवलं होतं. काँग्रेसने सर्व काही दिलं. नेता बनवलं. पण तरीही ते पक्ष सोडून जात आहेत”, असा खेद रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

‘ईडीचा, सीबीआयचा दबाव आहे का?’
“मी एक गोष्ट सांगू इच्छितो, अशाप्रकारे पक्ष सोडून जे लोकं जात आहेत त्यांना जनता मान्य करणार नाही. आम्ही राजकारणात विचारधारेच्या आधारावर काम करणारी माणसं आहोत. पक्ष बदलणं आणि आयाराम गयाराम होणं याला राजकारणात महत्त्व नाही. त्यांनी सांगितलं पाहिजे की, त्यांच्यावर ईडीचा, सीबीआयचा दबाव आहे का? त्यांच्यावर काँग्रेसने काय अत्याचार केले? त्यांना दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचं सदस्य केलं. त्यांनी काहीच कारण सांगितलं नाही. आम्ही सर्व एकजुटीने काम करु”, असं चेन्नीथला म्हणाले.
रमेश चेन्नीथला यांची अजित पवारांवर टीका
“ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपने दरवाजा उघडा ठेवला आहे. अजित पवारांवर 70 हजार कोटींचा आरोप लावला. पक्ष बदलला ते पूर्ण स्वच्छ झाले. भाजप वॉशिंग मशिन आहे का? या देशात ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांना आपल्या पक्षात घेत आहेत. मग त्यांच्यावरील आरोप खोटे ठरतात”, अशी टीका रमेश चेन्नीथला यांनी केली.

लोकसभेत अशोक चव्हाण यांच्यावर आरोप

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात राज्यसभा, लोकसभेत अशोक चव्हाण यांच्यावर आरोप लावले, आदर्श घोटाळ्याबाबत आरोप केले. पण त्यांनी पक्षांतर केलं आता ते स्वच्छ झाले. भाजप वॉशिंग मशिन आहे? नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जे भेटतात ते स्वच्छ होऊन जातात. घोटाळा संपून जातो”, असं रमेश चेन्नीथला म्हणाले.

Web Title: Maharashtra congress incharge ramesh chennithala criticized on ashok chavan nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2024 | 04:49 PM

Topics:  

  • Ashok Chavan
  • Maharashtra Congress

संबंधित बातम्या

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर
1

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेरण्यासाठी काँग्रेसची नवी खेळी; ‘या’ पक्षाशी करणार हातमिळवणी?
2

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेरण्यासाठी काँग्रेसची नवी खेळी; ‘या’ पक्षाशी करणार हातमिळवणी?

Vilasrao Deshmukh Birth Anniversary: पक्षासोबत दोनदा बंडखोरी तरीही २ वेळा मुख्यमंत्री; असा आहे विलासराव देशमुखांचा जीवनप्रवास
3

Vilasrao Deshmukh Birth Anniversary: पक्षासोबत दोनदा बंडखोरी तरीही २ वेळा मुख्यमंत्री; असा आहे विलासराव देशमुखांचा जीवनप्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.