कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडासाफ; १० ही जागांवर महायुतीची दणदणीत विजय
विधानसभा निवडणुकीत राजकीय विश्लेषक आणि सर्वच एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत महायुतीने मोठं यश मिळवलं आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात तर महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला असून १० ही जागांवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. कॉंग्रेसच्या २ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या एका आमदाराला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर हसन मुश्रीफ यांच्यासह ४ विद्यमान आमदारांना आपलं स्थान राखण्यात य़श आलं आहे.
अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राजेश क्षिरसागर यांनी २०१९ च्या निवडणुकीत पराभवाचा वचपा काढत पुन्हा विजय मिळवला आहे. तर माजी आमदार के. पी. पाटील. डॉ. सुजित मिनचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील- सरूडकर यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला आहे.