Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला बचत गटांसाठी उमेद मॉल, विशेष न्यायालये अन्…; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये उमेद मॉल', विशेष न्यायालयांची स्थापना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा समावेश आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 29, 2025 | 03:58 PM
महिला बचत गटांसाठी उमेद मॉल, विशेष न्यायालये अन्...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

महिला बचत गटांसाठी उमेद मॉल, विशेष न्यायालये अन्...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

राज्याच्या मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुध्ये १० जिल्ह्यात ‘उमेद मॉल’, विशेष न्यायालयांची स्थापना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यासारखे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मोजकेच मंत्री उपस्थित होते.

दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या मंत्र्‍यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत , त्यांच्यावर चर्चा झाल्यांचं सांगितलं जात आहे. माणिकराव कोकाटे यांच्यासह संजय शिरसाट, योगेश कदम यांचा विषय बैठकीत घेण्यात आला होता. विधीमंडळात रमी गेमच्या व्हिडिओमुळे राजीनाम्याची मागणी होत असलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची अजित पवारांनी कान उघाडी केल्याचीही माहिती आहे.

महाराष्ट्राच्या या विभागातील 1068 शाळा बंद होणार? क्लस्टर शाळा धोरणाची अंमलबजावणी

ग्राम विकास विभाग : राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण १ हजार ९०२ पुरस्कार दिले जाणार.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त)@Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision pic.twitter.com/eke1tOSOWf

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 29, 2025

ग्राम विकास विभाग : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ म्हणजेच जिल्हा विक्री केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ या उमेद मॉलमुळे उपलब्ध होणार आहे.

सहकार व पणन विभाग : ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी. राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन होणार. त्यासाठी कृषीउत्पन्न बाजार समित्यांचे सनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

विधि व न्याय विभाग : महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे.

विधि व न्याय विभाग : पिंपरी-चिंचवड शहरात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या दोन न्यायालयांची स्थापना आणि या न्यायालयांसाठी पदांना मंजूरी देण्यात आली.

जलसंपदा विभाग : वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्प (ता. सेलू) प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नुतनीकरणाच्या कामासाठी २३१ कोटी ६९ लाख रुपयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे.

जलसंपदा विभाग : वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्पच्या (ता. आर्वी ) धरण व वितरण व्यवस्था नुतनीकरणाच्या कामासाठी १९७ कोटी २७ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता.

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सी, ई बाईक ॲप आता सरकार चालवणार, प्रताप सरनाईक यांची माहिती

महसूल विभाग : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद, मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता.

फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या ग्रँण्डमास्टर दिव्या देशमुख हीचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आलं.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी अभिनंदनाचा ठरावाला मंजूरी दिली.

 

 

Web Title: Maharashtra government approves umed malls in 10 districts and new courts panchayat awards in cabinet decisions latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Cabinet Decision
  • Maharashtra Cabinet Decision
  • Mahayuti Government

संबंधित बातम्या

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु
1

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु

उज्ज्वला योजना, एलपीजी अन् शिक्षण… मोदी सरकारने तिजोरी उघडली; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५ मोठे निर्णय
2

उज्ज्वला योजना, एलपीजी अन् शिक्षण… मोदी सरकारने तिजोरी उघडली; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५ मोठे निर्णय

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! वाढवण बंदर ‘फ्रेट कॉरिडॉर’ने समृद्धी महामार्गाला जोडणार
3

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! वाढवण बंदर ‘फ्रेट कॉरिडॉर’ने समृद्धी महामार्गाला जोडणार

Cabinet decision: राज्य परिवहन महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराच्या कालावधीत वाढ, आता ९८ वर्षांचा होणार करार
4

Cabinet decision: राज्य परिवहन महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराच्या कालावधीत वाढ, आता ९८ वर्षांचा होणार करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.